Arbaaz Khan and Salman Khan esakal
Premier

Salman Khan: "आमचे कुटुंब हादरले आहे"; गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराबाबत सलमानचा भाऊ अरबाजची पोस्ट

सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खाननं एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Salman Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अशाताच आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खाननं एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अरबाजची पोस्ट

अरबाजनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "अलीकडेच सलीम खान कुटुंबियांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली. ही घटना अतिशय अस्वस्थ करणारी आहे. या धक्कादायक घटनेने आमचे कुटुंब हादरले आहे. दुर्दैवाने आमच्या कुटुंबाच्या जवळ असल्याचा दावा करणारे आणि प्रवक्ते असल्याचे भासवणारे काही लोक मीडियासमोर बिनधास्त विधाने करत आहेत की, हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे आणि आमच्या कुटुंबावर याचा काहीही परिणाम होत नाहीये, जे की खरे नाहीये.त्यांची ही मते गांभीर्याने घेतली जाऊ नयेत."

"सलीम खान कुटुंबातील कोणत्याही सदस्याने या घटनेबाबत मीडियासमोर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. यावेळी या अनुचित घटनेच्या तपासात कुटुंबीय पोलिसांना मदत आणि सहकार्य करत आहेत. आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे आणि आमच्या कुटुंबाचे रक्षण आणि सुरक्षिततेसाठी ते त्यांच्या क्षमतेनुसार सर्व काही करतील, असे आश्वासन दिले आहे. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार.", असंही अरबाजनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पहाटे 5 वाजेच्या सुमारास दोन व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या घटनेतील दोन आरोपींना गुजरातच्या भुजमधून अटक केली.

सलमानचे चित्रपट

सलमाननं त्याच्या सिकंदर या आगामी चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा केली. तसेच त्याचे किक 2, पठाण वर्सेज टायगर हे देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सलमानच्या या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT