Premier

Bigg Boss Marathi 5 Day 2 : बिग बॉस मराठीमध्ये वाहतायेत प्रेमाचे वारे ; दुसऱ्याच दिवशी घरात जमली अरबाज-निकीची जोडी

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये नवीन जोडी जमली आहे. अरबाज आणि निकीचं फ्लर्टींग सुरू झालं असून प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चं नवीन पर्व सुरू झालं आहे. नवीन सीजनमध्ये सध्या अनेक ट्विस्ट पहिल्याच दिवसापासून पाहायला मिळत आहेत. वर्षा उसगावकर आणि निकि तांबोळी यांचं मेकअप करून भांडण सुरू झाले पहिल्याच दिवशी मतभेद सुरू असताना आता घरात नवीन जोडी ही बनली आहे.

कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर नुकताच नवीन प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की, अरबाज आणि निकी एकमेकांची फ्लर्ट करतायेत. निकी अरबाजला घरात असलेली चहाची मशीन चालत नसल्याचे सांगते. तेव्हा अरबाजच्या बाजूला असलेला घनश्याम पटकन म्हणतो की, "बिग बॉस आमच्या वहिनीचं तरी ऐका" त्यावर निकी आणि अरबाज लाजतात. त्यानंतर घनश्याम अरबाजला म्हणतो की, "तुझ्या प्रेमाच्या नादात आमचा चहा उतू गेला तर कसं व्हायचं." यावर ते दोघेही हसतात.

सोशल मीडियावर हा प्रोमो गाजत असून अनेकांनी या नव्या जोडीचं कौतुक केलं आहे. तर काहींनी निकी फक्त अरबाजचा फायदा करून घेईल असं म्हंटलं आहे. आता नेमकं घरात काय घडणार हे येणाऱ्या एपिसोड्स मध्ये समजेल.

घरात पहिल्याच दिवशी भांडणाला सुरुवात झाली आहे. वर्षा यांच्या वागण्यावर जान्हवी आणि निकी नाराज आहेत. तर घरात फॉरेनर स्पर्धक येण्यावरून अंकितानेही नाराजी व्यक्त केली आहे. तर मेकअप करण्यावरून वर्षा आणि निकी यांचं भांडण झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळालं.

आता निकी आणि अरबाजची जोडी जमणार ? की घरात नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन 5 फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT