Bigg boss marathi 5 esakal
Premier

BB Marathi 5: निक्कीला भेटायला धावत आला अरबाज; नेटकऱ्यांच्या एकाहून एक भन्नाट कमेंट, म्हणतात- सुरज बोललेला ते...

Bigg Boss Marathi 5 New Promo Arbaaz Meet Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी ५' मध्ये आज रियुनियन होणार आहे. अरबाज आणि निक्की तांबोळी एकमेकांना भेटणार आहेत.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' ने टीआरपी च्या जगात नवा रेकॉर्ड केला आहे. या सीझनला सगळ्यात जास्त टीआरपी मिळाला आहे. त्यामुळे 'बिग बॉस मराठी ५' चे मेकर्स कार्यक्रमात नवनवीन ट्विस्ट आणत आहेत. आज घरातल्या सर्व स्पर्धकांचं रियुनियन होणार आहे. बिग बॉस मराठी ५चे सगळे सदस्य आज घरात येणार आहे. मात्र यासोबतच घरात एंट्री होणार आहे ती अरबाज पटेलची. अरबाज घरात येऊन नेमकं काय बोलणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही आता उत्सुक आहेत. मात्र या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.

कलर्स वाहिनीने एक नवा प्रोमो शेअर केला आहे. यात आधीचे सगळे स्पर्धक घरात येताना दिसत आहेत. मात्र सगळ्यात शेवटी येतो तो अरबाज पटेल. अरबाज धावतच घरात येतो. येताच तो निक्कीला मिठी मारतो आणि उचलून घरात नेतो. त्यानंतर ते दोघे बोलताना दिसतात. बोलताना अरबाज म्हणतो किमी जाताना रडलो नाही म्हणून तुला वाईट वाटलं. त्यावर निक्की म्हणते, मला वाटलं तू सुटला इथून म्हणून तू रडला नाही. त्यावर अरबाज तिची समजूत काढताना दिसणार आहे. आता तो काय बोलणार यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र नेटकरी यावर भन्नाट कमेंट करताना दिसत आहेत. अखेर सुरज जे म्हणालेला ते खरं झालं, असं नेटकरी म्हणत आहेत.

एक नेटकऱ्याने लिहिलं, '२० फुटावर उभ्या असलेल्या निक्कीसाठी हा अरबाज असा का पळत जातोय, लाईट, कॅमेरा ऍक्शन बोलल्यासारखा. नाटकी आहे.' दुसऱ्याने लिहिलं, 'स्वतःचं पाच वर्षाचं रिलेशन तोडून इथे प्रेमाचं नाटक करायला आलाय हा. लोकांनी बरोबर तुझी जागा दाखवलीय.' आणखी एकाने लिहिलं, 'दोघेही फक्त फेम साठी नाटक करत आहेत.' एका नेटकऱ्याने लिहिलं, 'आता अरबाज आणि निक्कीचं लग्नही दाखवा सेटवर. तेवढाच टीआरपी मिळेल ना.' आणखी एकाने लिहिलं, 'अरबाज प्ले बॉय आहे. प्रत्येक शोमध्ये याला नवीन मुलीवर प्रेम होतं. सगळी नाटकं आहेत.' दुसऱ्याने लिहिलं, 'काय तो ड्रामा.... काय ते नाटक.' अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT