arbaz patel  esakal
Premier

Bigg Boss Marathi 5: महाराजांचा जयजयकार सुरू असताना हाताची घडी घालून उभा राहिल्याने वादात अडकलेला अरबाज पटेल नेमका कोण ?

Arbaz Patel Controversy In Bigg Boss Marathi 5: सध्या 'बिग बॉस मराठी ५' पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. अरबाज पटेल सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Payal Naik

Who Is Arbaz Patel : कलर्स मराठीवर सुरू असलेल्या 'बिग बॉस मराठी ५' ने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. घरात आलेल्या १६ सदस्यांपैकी एक सदस्य पुरुषोत्तम दादा पाटील पहिल्याच आठवड्यात घराबाहेर गेले. मात्र त्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं. पुरुषोत्तम दादा पाटील घरातून बाहेर जात असताना त्यांनी अनेक घोषणा दिल्या. संतांचा जयजयकार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार केला. त्यावर घरातील सगळेच सदस्य त्यांच्यासोबत घोषणा देताना दिसले. मात्र अरबाज पटेल शांतपणे उभा होता. अरबाज सुरुवातीपासूनच अगदी शांतपणे उभा होता. त्यामुळे महाराजांचा जयजयकार सुरू असताना हाताची घडी घालून शांत उभा असलेल्या अरबाजवर प्रेक्षक नाराज आहेत. हा अरबाज नेमका कोण आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

'बिग बॉस मराठी ५' मध्ये यावेळेस वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. त्यात अरबाजदेखील आहे. सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा अरबाज हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा (औरंगाबाद) आहे. तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे. अरबाजच्या इंस्टाग्राम आयडीवर त्यान अरबाज पटेल आणि अरबाज शेख अशी दोन्ही नावं लिहिली आहेत. त्याची सोशल मीडियावर प्रचंड फॉलोविंग आहे. त्याचे इंस्टाग्रामवर २० लाख तर युट्यूबवर १० लाख फॉलोवर्स आहेत. तो लोकप्रिय शो 'स्प्लिट्स व्हिला ५ मध्ये दिसला होता. त्याच्या खेळाचं कौतुकही झालं होतं. तो फिटनेस फ्रिक असल्याने त्याच्या चाहत्यांची संख्या जास्त आहे.

डिजिटल जगातील एक लोकप्रिय चेहरा म्हणून अरबाजची ओळख आहे. सध्या तो 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दिसतोय. तर नुकतंच त्याचा आणि निकी तांबोळी यांचा वादही पाहायला मिळाला होता. आता अरबाज घरात आणखी काय धुमाकूळ घालतोय याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT