arjun rampal  sakal
Premier

Arjun Rampal: अर्जुन रामपालने सांगितलं २१ वर्षाचा संसार मोडण्याचं कारण, म्हणाला- मी ते करायला नको होतं...

Arjun Rampal On Divorce: लोकप्रिय अभिनेता अर्जुन रामपाल याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याचं लग्न तुटण्याचं कारण सांगितलं आहे.

Payal Naik

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. मात्र त्याचं वैयक्तिक आयुष्यदेखील चर्चेचा विषय राहिला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेकदा भाष्य केलं जातं. त्याने आपला २० वर्षाचा संसार मोडला. अर्जुनने १९९८ मध्ये मेहेरशी लग्नगाठ बांधली मात्र २०१९ मध्ये ते वेगळे झाले. तेव्हा त्याला दोन मुलीही होत्या. त्यानंतर तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लिव्हइनमध्ये राहू लागला. ते दोघेही दोन मुलांचे पालक आहेत. मात्र त्यांनी लग्न केलेलं नाही. असं सगळं असताना आता एका मुलाखती त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं आहे. या घटस्फोटामध्ये आपली चूक होती असं तो म्हणाला आहे.

अर्जुन रामपालने 'द रणवीर शो' मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत बोलताना अर्जुन म्हणाला, 'नाते तुटण्यासाठी तुम्ही कोणाला दोष देऊ शकत नाही. ज्या चुका झाल्या त्याचा विचार करणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही सर्व काही थांबवून स्वतःबद्दल विचार करता तेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये अनेक कमतरता दिसतील. तुमच्यासोबत समोरच्या व्यक्तीच्या उणिवाही तुम्हाला कळतील. पण तुम्हाला नात्यासाठी सर्वकाही बरोबर करावे लागेल.

लवकर लग्न केलं

लवकर लग्न करण्यावर अर्जुन म्हणाला - 20-30 हे लग्नासाठी खूप कमी वय आहे. मी वयाच्या 24 व्या वर्षी लग्न केले, जे खूप लवकर होते. पुरुष स्त्रियांपेक्षा हळू हळू परिपक्व होतात आणि हे सिद्ध झाले आहे की आम्ही पुरुष मूर्ख आहोत. मेहरपासून घटस्फोट घेणे खूप अवघड होते कारण त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होतो.'

मेहर आणि अर्जुनला दोन मुली आहेत. ज्यांच्यासोबत तो अनेकदा वेळ घालवताना दिसतो. त्यांच्यासोबतचे फोटोही तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अर्जुन त्याच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान मॉडेल गॅब्रिएलाला डेट करत आहे. या जोडप्याला दोन मुलेही आहेत. अर्जुन आणि गॅब्रिएलाने अजून लग्न केलेलं नाही. दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT