arun kadam vaishali kadam  esakal
Premier

अगं तू कशी, तो कसा, याच्याशी लग्न का केलंस? अरुण कदम यांच्या पत्नीला अनेकदा केलं गेलं ट्रोल, आता दिलं सणसणीत उत्तर

arun kadam Wife Reply To Trollers: लोकप्रिय अभिनेते अरुण कदम यांना आणि पत्नीला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता त्यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.

Payal Naik

आपल्या जबरदस्त कॉमेडीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या अरुण कदम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांच्या विनोदाच्या स्टाइलचं आणि मालवणी भाषेचं कायमच कौतुक होतं. प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या अरुण यांचं वैयक्तिक आयुष्यही सोशल मीडियावर चर्चेत असतं. अरुण आणि त्यांच्या पत्नी वैशाली कदम या त्यांच्या लूकवर ट्रोल होताना दिसतात. मात्र वैशाली त्यांना नेहमीच सडेतोड उत्तर देतायत. आता दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अरुण कदम यांच्याशी लग्नाचा निर्णय का घेतला याचं कारण सांगितलं आहे.

अरुण आणि वैशाली कदम यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना वैशाली म्हणाल्या, '"आमच्या दिसण्यावरुन आम्हाला खूप ट्रोल केलं जातं. पूर्वी जेव्हा मी यांच्याशी लग्न करायला होकार दिला होता. तेव्हादेखील आम्हाला ट्रोल केलं गेलं होतं आणि आताही केलं जातं. तू एवढी छान आहेस. मग तू याच्याबरोबर लग्न का करतेस? पू्र्वी आम्ही बैठ्या चाळीत राहायचो. तेव्हा मला खूप जण म्हणाले होते की तू हे लग्न का करतेस? तू छान दिसतेस. तुला अजून छान मुलगा मिळू शकतो.'

त्या पुढे म्हणाल्या, 'कुटुंबीय आणि बाहेरचे सुद्धा मला याबाबत बोलले. पण, फक्त माझे वडील या मतावर ठाम होते की हा मुलगा तुला सुखी ठेवेल. मी फक्त त्यांचं वाक्य लक्षात ठेवलं होतं. कोणी काही बोललं तरी मी लक्ष द्यायचे नाही. मी म्हणायचे की एखादा सुंदर मुलगा आहे आणि त्याने अर्धवट संसार मोडत मला सोडलं. तर त्याला जबाबदार कोण? किंवा तो देखणा असेल पण कमवतच नसेल, तर... अजूनही आमच्या फोटोंवरुन ट्रोल केलं जातं.'

त्यांनी एक किस्साही सांगितला. वैशाली म्हणाल्या, 'आता एका फोटोत आम्ही हार घातला होता. तेव्हा एकाने कमेंट केली होती की आता तुमचं लग्न झालं का? मी म्हणाले ३० वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. आता नाही झालेलं. एकाने मी यांची सून आहे का असं विचारलेलं मी म्हणालेमी त्यांची बायको आहे. मी कुणाकडे लक्ष देत नाही.' वैशाली यांच्या उत्तराने अनेकांचं तोंड बंद झालं आहे. अरुण कदम आणि वैशाली यांनी नुकतंच त्यांच्या नातवांसोबत खास फोटोशूट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT