Aryan Khan esakal
Premier

Aryan Khan: शाहरुखचा लेक करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? 'त्या' फोटोमुळे चर्चेला उधाण

Aryan Khan: आर्यन हा ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री लॅरिसा बोनेसीला (Larissa Bonesi) डेट करत आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

priyanka kulkarni

Aryan Khan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आर्यन खानचं नाव अनन्या पांडे (Ananya Panday), शनाया कपूर (Shanaya Kapoor) यांच्यासोबत अनेकदा जोडलं जातं पण आता आर्यन हा ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री लॅरिसा बोनेसीला  (Larissa Bonesi) डेट करत आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

आर्यन आणि लॅरिसा यांचा फोटो व्हायरल

सोशल मीडियावर आर्यन आणि लॅरिसा यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. आर्यनच्या कपड्यांच्या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये देखील लॅरिसा दिसली. जाहिरातीमध्येआर्यन आणि लॅरिसा हे एकमेकांच्या जवळ उभा राहिलेले दिसली. त्यानंतर आर्यन आणि लॅरिसा यांच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली.

इन्स्टाग्रामवर एकमेकांना करतात फॉलो

आर्यन खान हा इंस्टाग्रामवर लॅरिसाला फॉलो करतो. वाढदिवशी लॅरिसाच्या आईला आर्यनने खास भेटवस्तू दिली होती, असंही म्हटलं जात आहे.

Aryan Khan

जाणून घ्या लॅरिसाबद्दल...

प्रसिद्ध गायक गुरू रंधवाच्या 'सूरमा सुरमा' या म्युझिक व्हिडीओमध्ये लॅरिसानं काम केलं आहे. तिने स्टेबिन बेन आणि विशाल मिश्राच्या संगीत व्हिडीओमध्ये देखील काम केलं आहे. तिने काही साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

लॅरिसानं 'या' चित्रपटांमध्ये केलं काम

2016 मध्ये रिलीज झालेल्या 'थिक्का' या तेलुगू कॉमेडी चित्रपटामध्ये लॅरिसानं काम केलं आहे. लॅरिसाने मौनी रॉयसोबत 'पेंट हाउस' या चित्रपटात काम केले आहे. लॅरिसाचं नाव याआधी सूरज पांचोलीसोबत जोडलं जात होतं. पण आता तिच्या आणि आर्यनच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

लॅरिसा ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. लॅरिसा ही तिच्या विविध लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 563k फॉलोवर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Real Estate Development : २०१६ ते २०२६ दरम्यान पिंपरी चिंचवडचे चित्र बदलले; शेतजमिनी कमी होऊन टोलेजंग इमारतींची संख्या वाढण्यामागे काय?

Shankar Maharaj Math : धनकवडीतील शंकर महाराज मठाच्या अन्नछत्राला एफडीएचा दणका; परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद

Tata Group: टाटा समूहात खळबळ! रतन टाटा यांचे सख्खे भाऊ जिमी टाटा यांचे नोएल टाटांवर गंभीर आरोप; म्हणाले...

IPL Retaintion झालं, आता लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे अन् खेळाडूंची जागा शिल्लक? पाहा यादी

Pimpri Cyber Police : सायबर गुन्हेगारांना १२ हजार बनावट सिमकार्डचा पुरवठा; पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT