ashish vidyarthi  sakal
Premier

Ashish Vidyarthi: साठीत बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ... बॉलीवूडच्या खतरनाक व्हिलनला पहिल्या पत्नीने का दिलेला घटस्फोट?

Ashish Vidyarthi Birthday: बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

सकाळ डिजिटल टीम

Ashish Vidyarthi Birthday: हिंदी, तामिळ, मल्याळम अशा तब्बल ११ भाषांमध्ये काम करणारे बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक आशिष विद्यार्थी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांनी जवळपास ३०० पेक्षा जास्त चित्रपटात भूमिका केल्या आहेत. आज १९ जून रोजी आशिष यांचा वाढदिवस आहे. आशिष हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. वयाच्या ६० व्या वर्षी आशिष यांनी १० वर्ष लहान महिलेशी विवाह केला. या विवाहाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. या लग्नानंतर त्यांची पहिली पत्नी पिलू विद्यार्थी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या घटस्फोटाचं कारण सांगितलं होतं.

आशिष यांचं लग्न पिलू यांच्याशी झालं होतं. त्यांना २२ वर्षाचा मुलगा देखील आहे. त्यांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेतला. पिलू यांनी इ टाइम्सशी बोलताना त्यांच्या घटस्फोटाचं कारण सांगितलेलं. त्या म्हणालेल्या, 'आम्ही नेमके का वेगळे झालो, यामागचं कारण संपूर्ण जग शोधत आहे. पण खरं जे कारण आहे, त्यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. कारण ते त्यांनी रचलेल्या कथेशी जुळत नाही. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आमचं कनेक्शन आहे. पण आमचे मार्ग एकमेकांशी जुळत नव्हते इतकंच. एके दिवशी माझ्या लक्षात आलं की माझी चॉइस बदलली आहे.'

त्या पुढे म्हणाल्या, 'आम्ही दीड वर्ष त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला लक्षात आलं की भविष्यासाठी आमचे विचार आणि ध्येय एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. मी माझं काम करत आहे आणि आज मी खूप आनंदी आहे. मी माझं कर्तव्य पूर्ण केलं आहे. माझे माझ्या सासरच्या लोकांशी आणि संपूर्ण कुटुंबाशी खूप चांगले संबंध आहेत. ते सर्व लोक माझ्याशी खूप प्रेमाने बोलतात. त्यांनाही माहीत आहे की आम्ही इतकी वर्षे, इतका वेळ खूप चांगला घालवला. पतीला पत्नी म्हणून जी साथ हवी असते, ती मी त्यांना देऊ शकत नव्हते. पण मी कधीच त्यांचा तिरस्कार केला नाही.'

त्यांनी सांगितलं, 'त्यांनी मला मारलं किंवा घरात डांबून ठेवलं नव्हतं. प्रत्येकजण वेगळा असतो, कोणीही चुकीचं नाही, कोणीही बरोबर नाही, परंतु मी आता स्वतःला कोणाची तरी बायको म्हणून पाहू शकत नाही. मी त्यांना माझ म्हणणं सांगितलं आणि त्यांनी त्याचा आदर केला आणि सत्य स्वीकारलं. इथे कोणाचीच चूक नाही. आशिष कधीही मालिका पाहत नाही, पण मी काम करतेय याचा त्यांना आनंद आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

Solapur heavy rain: सोलापुरातील पावसामुळे देगाव ओढ्याला पूर; शेतीचं मोठं नुकसान, पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं

SCROLL FOR NEXT