atul parchure ashok saraf esakal
Premier

Atul Parchure Death: अतुल परचुरे यांच्या निधनाने अशोक सराफ यांना अश्रू अनावर; म्हणाले- तो पटकन निघून गेला हेच...

Ashok Saraf Reaction On Atul Parchure Death: लोकप्रिय मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं कर्करोगाने निधन झाल्यानंतर अभिनेते अशोक सराफ यांनी त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Payal Naik

मराठी सिनेसृष्टीतील आणखी एक तारा आज निखळला. ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं आज १४ ऑक्टोबर रोजी निधन झालं. गेली दोन वर्ष ते कर्करोगाशी झुंज देत होते. ते या आजारपणातून बरेही झाले होते मात्र पुन्हा एकदा त्यांची तब्येत बिघडली आणि अखेर या आजाराने त्यांना हिरावून घेतलं. एका उत्कृष्ट कलाकाराच्या निधनाने मराठी सिनेसृस्ष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यात आपल्या जवळच्या मित्राच्या जाण्याने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना शोक अनावर झाला आहे. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

अतुल यांच्या निधनावर बोलताना अशोक मामा म्हणाले, 'मला अगदी २ मिनिटांपूर्वी ही बातमी कळली. अत्यंत वाईट गोष्ट आहे ही. मराठी चित्रपटसृष्टीसाठी आई वैयक्तिक आमचा मित्र म्हणून एक अत्यंत वाईट गोष्ट घडलेली आहे. एक चांगला अभिनेता इंडस्ट्रीने गमावलेला आहे. मी आजपर्यंतचा त्याचा प्रवास पाहिलेला आहे. ज्या ज्या पद्धतीच्या भूमिका त्याने केल्या आहेत. त्याने स्वतःचं नाव निर्माण केलं होतं. तो पटकन असा निघून गेला म्हणजे ही सहन करण्यासारखी गोष्ट नाहीच आहे. म्हणजे असं नको घडायला पाहिजे. फार चांगला नट होता तो. फार चांगला मुलगापण होता. त्याच्यामुळे त्याचं असं जाणं सतत मनाला जाणवत राहील, सतत मनाला दुःख देत राहील. काय बोलावं मला खर्च सुचत नाहीये. शब्दच नाहीयेत माझ्याकडे.'

ते पुढे म्हणाले, 'काही कळतच नाहीये. एक खूप वाईट गोष्ट घडली. आमच्या वैयक्तिक पातळीवर माझा अत्यंत जवळचा मित्र आवडता मित्र मी गमावलाय. त्याने एका चित्रपटात माझी बालपणाची भूमिका साकारली होती. त्यामुळे मी त्याला विसरूच शकत नाहीये. एवढा जवळचा तो माझा मित्र होता.' अशोक सराफ यांना हे बोलताना हुंदका दाटून आला होता. अतुल यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवला. मात्र आता त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा फटका! सेन्सेक्स 340 अंकांनी कोसळला, निफ्टी 23,100 खाली; 3 नवे IPO बाजारात

प्रसिद्ध गायकाच्या जिमबाहेर गोळीबार, सलमानसोबत संबंधामुळे टार्गेट; बिश्नोई गँगने घेतली हल्ल्याची जबाबदारी

FIFA World Cup: बाबो! बक्षीस रक्कम एकूण ६५.५ कोटी डॉलर; विजेता-उपविजेत्याला किती डॉलर मिळणार?

"Viral रील पाहून प्रेक्षकांनी नाटकाला गर्दी केली" चिरंजीव परफेक्ट बिघडलायच्या टीमने शेअर केला अनुभव

Latest Marathi News Live Update : हिंगोलीमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी घातला गोंधळ

SCROLL FOR NEXT