Ashok Saraf Talked On Dubbing For Chhatrapati Shivaji Maharaj esakal
Premier

म्हणून अशोक सराफ यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकांना आवाज दिला नाही, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

Ashok Saraf Talked On Dubbing For Chhatrapati Shivaji Maharaj: लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला कधीही आवाज का दिला नाही यामागेही मोठं कारण आहे.

Payal Naik

Ashok Saraf Unknown Facts: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी इंडस्ट्रीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा यांनी प्रेक्षकांना कधीही निराश केलं नाही. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या. कधी विनोदी तर कधी खलनायकाच्या भूमिका साकारून मामांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. सध्या सिनेसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी उत्सुक असलेले कलाकार दिसतात. प्रत्येक कलाकाराला आपण महाराजांची भूमिका करावी किंवा त्यांच्या भूमिकेला आवाज द्यावा असं वाटतं. मात्र अशोक मामांनी महाराजांच्या भूमिकेला आवाज देणं टाळलं होतं. त्यांनी महाराजांच्या भूमिकेला आवाज देण्यास नकार दिला होता असं का, हे एका भाषणात मामांनी सांगितलं होतं.

मामांना एका चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेला आवाज देण्यासाठी विचारणा झाली होती. मात्र त्यांनी नकार दिला होता. एका कार्यक्रमात मामांनी तो किस्सा सांगितला. आपण या भूमिकेला आवाज द्यायला नकार का दिला हे सांगताना मामा म्हणाले, 'द्यायला काही हरकत नाही ओ आवाज पण मला काहीच माहीत नाही. मी म्हटलं तू एक काम कर. बाबासाहेबांना माझा प्लिज निरोप दे की मी नाही करू शकत हे. मी नाही रेकॉर्डिंग करू शकत तुमचं. मी महाराजांच्या भूमिकेला आवाज नाही देऊ शकत. त्यांनी विचारलं का? मी म्हणालो, हे बघ शिवाजी महाराजांचा आवाज द्यायचा. मला काही माहीत नाही रे. शिवाजी महाराज कसे होते, मी कधी पाहिलं नाही त्यांना, ते कसे बोलत होते. त्यांच्या बोलण्याचा आवाज कसा होता, धीरगंभीर होता, असा वरच्या स्वरात होता.'

पुढे मामा म्हणाले, 'ते कुठल्या स्वरात बोलायचे काहीच ठाऊक नाही. काहीच माहीत नाही. मी नाही देऊ शकत. त्यांना सांगा मी नाही नाही देऊ शकत प्लिज. कारण काय आहे माझा एक ओळखीचा आवाज आहे महाराष्ट्रात. तो जर शिवाजी महाराजांच्या रेकॉर्डिंगमध्ये जर मध्येच दिसला तर ते बरोबर होणार नाही. हा त्यांचा अपमान केल्यासारखं होईल. आणि ते मला नाही जमणार.' अशोक मामा यांच्या या उत्तरावर प्रत्येक प्रेक्षकाने त्यांचं कौतुक केलं. अशोक मामा लवकरच कलर्स मराठीवरील 'अशोक मा मा' या मालिकेत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed news: 'Dhananjay Munde यांचा संबंध नाही, कराडच्या मुलानेच खून..'

Vaibhav Suryavanshi चे टीम इंडियात लवकरच पदार्पण? 'या' स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या डिटेल्स

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

दादा कोंडकेंच्या निधनानंतर कुणाला मिळाली त्यांची कोट्यवधींची संपत्ती? दादांच्या मृत्युपत्रात नेमकं काय लिहिलेलं?

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT