Ashok Saraf,Sharad Pawar 
Premier

Ashok Saraf: "ते माझे आवडते नेते आहेत, त्यांनी माझं काम..."; अशोक सराफ यांच्याकडून शरद पवारांचे कौतुक

Sharad Pawar: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते अशोक सराफ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

priyanka kulkarni

Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना काल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते अशोक सराफ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेते अशोक सराफ यांनी पुरस्कार सोहळ्यात भाषण केले. या भाषणात अशोक सराफ यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. "शरद पवार हे माझे आवडते नेते आहेत", असं अशोक सराफ यांनी भाषणात सांगितलं.

अशोक सराफ म्हणले, "शरद पवार यांनी माझं काम मोजून तीन मिनिटांमध्ये केलं"

नाटककार गो. ब. देवल स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी पुरस्कार विजेते अशोक सराफ यांनी भाषण केलं. या भाषणात अशोक सराफ म्हणाले, "मराठी नाट्य परिषदेकडून मिळालेला पुरस्कार हा महत्वाचा आहे. आदरणीय शरद पवारसाहेबांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. शरद पवार हे खरोखरच आदरणीय आहेत. ते माझे आवडते नेते आहेत. ते लोकांचे काम करण्यासाठी नेहमी तयार असतात. माझं एक काम होतं. ते काम त्यांनी मोजून तीन मिनिटांत केलं. अनेकवेळा लोकं काम झालं,असं म्हणतात पण ते काम व्हायला बरेच दिवस लागतात. पण शरद पवार यांनी जे काम झालंय सांगितलं ते काम लगेच होतं."

"शरद पवार हे अजूनही सगळ्या लोकांना नावासह ओळखतात. मी त्यांना आधी कधी भेटलो नव्हतो, पण जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा ते हसले मग मी, म्हणालो ते मला ओळखतात.", असंही अशोक सराफ भाषणात म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT