Ashok Saraf On Ashi Hi Banwa Banwi esakal
Premier

Ashok Saraf: 'अशी ही बनवा बनवी'चा रिमेक बनवावा का? अशोक सराफ यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले- तो चित्रपट म्हणजे...

Ashok Saraf On Ashi Hi Banwa Banwi Remake: लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक सराफ यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'बनवाबनवी' या चित्रपटाचा रिमेक बनवावा का याबद्दल भाष्य केलं आहे.

Payal Naik

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या चित्रपटांची संख्या मोठी आहे. मराठीसोबतच हिंदीमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांचे लाखो चाहते आहेत. विनोदी असो व गंभीर प्रत्येक भूमिकेत त्यांनी जीव ओतला. असं असलं तरी त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात गाजलेला चित्रपट म्हणजे 'अशी ही बनवा बनवी'. बनवा बनवी या चित्रपटाचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. हा चित्रपट लागला की घरातील सगळे आजही टीव्हीसमोर ठाण मांडून बसतात. गेल्या काही दिवसांपासून या आयकॉनिक चित्रपटाचा रिमेक केला जाणार का यावर चर्चा होताना दिसत आहेत. आता अशोक सराफ यांनीही यावर आपलं मत मांडलं आहे.

अशोक सराफ यांनी नुकतीच साम टीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, '३५ वर्ष झाले लोक बनवा बनवी बघतायत. अजूनही बघतायत सगळे. या चित्रपटाने वेगळाच इतिहास घडवला आहे. अतिशय वेगळा असा हा चित्रपट होता. सतत सगळीकडे बघितला जातो. त्याचं कारण कन्टेन्ट त्यातला. त्याचा लेखक वसंत सबनीस. असा लेखक होणे नाही. मराठी चित्रपटासाठी त्याने जी कॉमेडी लिहिली, चौघांची धडपड जी लिहिली, प्रश्नच नाही. दिग्दर्शक सचिन याने ते व्यवस्थित मांडलं. लक्ष्मीकांत बेर्डे, त्याने तर जे काही केलं ते औरच आहे. मला असं वाटतं त्याच्या आयुष्यातील सगळ्यात चांगली भूमिका ती आहे. सचिन तर इतका सुंदर मुळी दिसलाच नाही कधी.'

ते पुढे म्हणाले, ' कधीकधी जमून जातं असं. म्हणून त्याचा रिमेक करणं थोडं कठीण आहे. रिमेक तितकाच चांगला व्हायला हवा किंवा त्यापेक्षाही जास्त चांगला असायला हवा. त्यामुळे हे थोडं अवघडच आहे.' यापूर्वी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी बनवा बनवी या चित्रपटाचा रिमेक होऊ शकत नाही असं मत दिलं होतं. लक्ष्याशिवाय हा चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही त्यामुळे याचा रिमेक बनवणं अशक्य आहे असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sankeshwar Banda Road Toll Plaza : संकेश्वर -बांदा रोडवरील आजऱ्याचा टोल हलणार; नितीन गडकरींचे आदेश, प्रकाश आबिटकरांनी दिली माहिती

१० वर्षांच्या भावाने शतक ठोकताच श्रीलंकेतून वैभव सूर्यवंशीची मोठी प्रतिक्रिया; इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाला...

पेंच व्याघ्र प्रकल्पात AI आधारित 'टायगर अलार्म सिस्टम'; वाघ येण्याआधी सायरन वाजणार; नेमकी यंत्रणा काय?

Latest Marathi News Live Update : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचाल करणे दुचाकी स्वराला उडवलं, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

आणखी एका मराठी अभिनेत्रीची 'धमाल ४' मध्ये एंट्री; करणार अजय देवगनसोबत काम, भूत बनलेल्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT