Bade Miyan Chote Miyan esakal
Premier

Bade Miyan Chote Miyan: ठरलं! अक्षय आणि टायगरच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

Bade Miyan Chote Miyan: अक्षय आणि टायगरनं 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट शेअर केली आहे.

priyanka kulkarni

Bade Miyan Chote Miyan: बॉलिवूडचा तरुण अँक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार? असा प्रश्न गेल्या काही दिवांपासून टायगर आणि अक्षय यांच्या चाहत्यांना पडला होता. अशातच आता अक्षय आणि टायगरनं 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट शेअर केली आहे.

कधी रिलीज होणार ट्रेलर?

बहुप्रतिक्षित 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचा ट्रेलर 26 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यानंतर म्हणजेच 10 एप्रिल रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. टायगरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर प्रेक्षकांना ट्रेलरच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे.

टायगरनं 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "रियल अॅक्शन का एक बडा डोस देने आ रहे हैं 'बडे मियाँ छोटे मियाँ'. ट्रेलर 26 मार्चला होणार रिलीज!"

टायगरनं शेअर केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरवर टायगर आणि अक्षयसोबतच मानुषी छिल्लर,अलाया या दोघी देखील दिसत आहेत. या पोस्टरमध्ये टायगर, अक्षय, मनुषी आणि आलाया यांच्या हातात बंदुक दिसत आहे.

टायगरचे आगामी चित्रपट

'बडे मियाँ छोटे मियाँ' व्यतिरिक्त टायगर श्रॉफ त्याच्या आगामी 'रॅम्बो', 'सिंघम अगेन' आणि नुकत्याच जाहीर झालेल्या 'बागी 4' या चित्रपटांमध्ये टायगर इफेक्ट दाखवण्यासाठी सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO Listing: जिओच्या शेअरची बाजारात धडाक्यात एंट्री! 21.36% प्रीमियमवर लिस्टिंग; गुंतवणूकदारांना किती फायदा?

Priyanshu Moliya Triple Century : ३७ चेंडूंत १५० धावा... भारताच्या २१ वर्षीय फलंदाजाचे त्रिशतक, ६९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; चेतेश्वर पुजाराच्या पंक्तीत जाऊन बसला

मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; पुर्णेकर समर्थकांच्या आंदोलनाचा फटका

LPG Gas Price Today: दिवाळीपूर्वी गॅस सिलिंडर महागला की स्वस्त? मुंबई-पुणे-नागपूरसह महाराष्ट्रातील शहरांचे दर पाहा

IND vs NZ 4th T20I : अभिषेक-वैभवची फटकेबाजी अन् चौथ्या मॅचची तिकीटं Sold OUT! पण हा सामना तुम्हाला Free पाहण्याची संधी; कधी, कुठे व केव्हा?

SCROLL FOR NEXT