Poonam Pandey 
Premier

एक्स बॉयफ्रेंडनं बाथरुममधला 'तो' व्हिडिओ केला होता लीक; पूनम पांडेनं सांगितला किस्सा, म्हणाली, "तो माझे सगळे केस..."

Poonam Pandey Bathroom video leaked: अभिनेत्री पूनम पांडे आणि वाद हे जवळपास एक समीकरणच झालं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अभिनेत्री पूनम पांडे आणि वाद हे जवळपास एक समीकरणच झालं आहे. काही दिवसांपूर्वी पूनमने आपल्या मृत्यूची बातमी पसरवली होती. त्यानंतर ती खोटी असल्याचं तिनेच समोर येऊन सांगितलं. यावरुन तिच्यावर बरीच टीका देखील झाली. पण, याचा तिला जास्त फरक पडत नसल्याचं चित्र आहे. (Poonam Pandey Bathroom video leaked)

पूनम पांडे हिने Hauterrfly ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाथरुममधला लीक झालेल्या तिच्या जुन्या व्हिडिओ बद्दल माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी पूनम पांडेचा बाथरुममधला व्हिडिओ लीक झाला होता. पूनमचा हा नवा पब्लिसिटी स्टंट असल्याचं त्यावेळी बोललं गेलं होतं. पण, पूनमने याबाबत खुलासा केला आहे. तिने म्हटलंय की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने हा व्हिडिओ लीक केला होता.

पूनम म्हणाली की, 'मला तो दिवस आजही आठवतो आणि त्या दिवसाला मी कधीही विसरु शकत नाही. आम्ही एकमेकांशी भांडलो होतो. मला त्याच्यापासून वाचायचं होतं. कारण, त्याने ट्रिमर हातात घेतलं होतं आणि तो माझे केस ट्रिम करणार होता. कसं तरी करून मी त्याच्या हातून ट्रिमर हिसकावला आणि खोलीच्या बाहेर पळाले. पण, माझा मोबाईल खोलीमध्येच राहिला होता.'

पूनमने सांगितलं की, ती घरी आली अन् तिने सर्व आपबीती आपल्या वडिलांना सांगितली. वडिलांनी त्याला फोन केला अन् याबाबत विचारणा केली. पूनमने सांगितलं की, एक्स बॉयफ्रेंडने तिचा व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली. त्याने वडिलांच्या फोनवरुन मला सांगितलं की, आताच्या आता तू परत ये. नाहीतर मी तुझा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकेन. मी परत येणार नसल्याचं त्याला सांगितलं.

एक्स बॉयफ्रेंडने खरंच तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. मला वाटलं नव्हतं की तो असं काही करेल. मला वाटलं नव्हतं की तो इतक्या खालच्या पातळीला जाईल. पण, तो गेला, असं पूनम म्हणाली. ती पुढे म्हणाली की, या व्हिडिओमुळे माझं आयुष्य खराब झालं. सगळ्यात वाईट म्हणजे त्याने व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर त्याचे मित्र त्याचं कौतुक करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेतील मृताच्या पत्नीनं संपवंल आयुष्य, २ चिमुकल्या मुली महिन्याभरात आई-वडिलांच्या मायेला पोरक्या

Vijay Mallya News: मल्ल्या-बँकांमधील वाद संपवण्याची गरज! मुंबई हायकोर्टाचे मोठे निरीक्षण; काय म्हणाले कोर्ट?

World Organ Donation Day 2026: फक्त अवयवदानाचा फॉर्म भरून होत नाही! मृत्यूनंतर तुमचे अवयव कसे दान केले जातात? जाणून घ्या प्रत्येक टप्पा

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

Horoscope: अचानक मिळते मोठी संधी; ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात येऊ शकतो मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT