saanand verma  ESAKAL
Premier

Bhabhi Ji Ghar Par Hai: 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्यावर झालेला लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, म्हणाला, "त्या घटनेनंतर..."

saanand verma: 'भाभीजी घर पर है' या मालिकेत अनोखेलाल सक्सेना ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेते सानंद वर्मा यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत एका मुलाखतीत खुलासा केला.

priyanka kulkarni

Bhabhi Ji Ghar Par Hai: अँड टीव्हीवरील गाजलेला कार्यक्रम 'भाभीजी घर पर है' (Bhabhi Ji Ghar Par Hai) ही सगळ्यात जास्त गाजलेली मालिका. प्रेक्षकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेतील सगळीच पात्रं लोकप्रिय ठरली आहेत. या मालिकेत अनोखेलाल सक्सेना ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेते सानंद वर्मा यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत एका मुलाखतीत खुलासा केला. ते लहान असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचं त्यांनी या मुलाखतीमध्ये उघड केलं.

सानंद यांनी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत या धक्कादायक प्रसंगाविषयी खुलासा केला. लहान असताना सानंद यांना क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. त्यावेळी त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना एक साधी बॅट,पॅन्ट आणि पांढरं टीशर्ट खरेदी करून दिलं होतं. ते बिहारमधील पटना शहरातून खेळत क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करत होते.

"त्या काळात एका मोठ्या माणसाने माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मी इतका घाबरलो होतो कि मी तिथून पळून गेलो. त्या घटनेचा मला इतका धक्का बसला कि मी पुन्हा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला नाही." याबाबत ते पुढे बोलताना म्हणाले,"अशा घटना तुमच्या डोक्यातून कधीच निघून जात नाही. त्या वेदना तुम्हाला सतत त्रास देतात पण त्यावर मात करून तुम्हाला पुढे जावं लागतं."

'भाभीजी घर पर है' या मालिकेत ते साकारत असलेली डोक्यावर परिणाम झालेल्या अनोखेलाल सक्सेनाची भूमिका सगळ्यांनाच कमालीची पसंत पडली आहे. ही मालिका दोन विवाहित पुरुषांवर आधारित असून त्यांना एकमेकांच्या पत्नीविषयी असणारं आकर्षण, त्यातून निर्माण होणारी असूया आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी ते करत असलेले प्रयत्न या विनोदी गोष्ट या मालिकेत पाहायला मिळते. या मालिकेत असिफ शेख, रोहिताश गौड, शुभांगी अत्रे आणि विदिशा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

'भाभीजी घर पर है' या मालिकेव्यतिरिक्त सानंद यांनी अनेक सिनेमांमध्ये आणि वेबसिरीजमध्ये सुद्धा काम केलं आहे. लापतागंज, सॅक्रेड गेम्स, अपहरण, गप चूप, मिशन राणीगंज, मर्दानी अशी त्यांच्या गाजलेल्या प्रोजेक्टची नाव घेता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळेतली पोरं...! डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानात शाहीन आफ्रिदीची उडवली खिल्ली; PSL च्या पत्रकार परिषदेत केला ना कल्ला... Video Viral

Hindu Muslim Unity : दुकानाला भीषण आग अन् आत शंकराची मूर्ती, धर्माच्या सीमा ओलांडून मुस्लिम तरुणांनी केलं धाडस, राज्यभरातून होतेय कौतुक

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत दुचाकी फक्त दोनशे, तर चार चाकी वाहनामध्ये दोन हजार रुपयांचे इंधन भरता येणार

Pune–Mumbai Expressway Traffic : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर निघालात? आधी हे वाचा, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

Kolhapur Fuel Limit : दुचाकीत 200 तर, चारचाकीत 2000 पर्यंतच मिळणार पेट्रोल; साठे बाजार करणाऱ्यांवर होणार कारवाई, बाटली-कॅनमधून दिल्यास दंड!

SCROLL FOR NEXT