Bhagyashree Mote esakal
Premier

Bhagyashree Mote: भाग्यश्री मोटे अन् विजय झाले वेगळे, अभिनेत्रीने पोस्ट करत दिली माहिती.. दोन वर्षांपूर्वी झाला होता साखरपुडा

priyanka kulkarni

Bhagyashree Mote: अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) आणि मेक-अप आर्टिस्ट विजय पालांडे (Vijay Palande) यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. भाग्यश्री आणि विजय यांचा साखरपुडा गेल्या वर्षी पार पडला होता. पण लग्नाआधीच त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत भाग्यश्रीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. भाग्यश्रीनं शेअर केलेली ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

भाग्यश्रीची पोस्ट

भाग्यश्री मोटेनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "नमस्कार मित्रांनो, ही पोस्ट केवळ माहिती देण्यासाठी आहे. एकमेकांसोबत राहण्याचा प्रयत्न करत असताना मी आणि विजय चांगल्या कारणांसाठी पार्टनर म्हणून वेगळे होत आहोत. आम्ही चांगले मित्र राहू! कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करा! धन्यवाद!" भाग्यश्रीनं या पोस्टला विजयला टॅग देखील केलं आहे. भाग्यश्रीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.

दोन वर्षांपूर्वी पार पडला भाग्यश्री आणि विजय यांचा साखरपुडा

भाग्यश्री मोटे आणि विजय पालांडे यांचा साखरपुडा दोन वर्षांपूर्वी पार पडला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. भाग्यश्री आणि विजय यांच्या साखरपुड्याला हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी देखील हजेरी लावली होती. विजय हा हृतिक रोशनचा मेक-अप डिझाइनर आहे.

भाग्यश्री मोटेनं 'या' चित्रपटांमध्ये केलं काम

भाग्यश्री मोटेनं मराठी चित्रपटांसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. विठ्ठल,मुंबई मिरर,माझ्या बायकोचा प्रियकर,काय रे रास्कला,एकदम कडक या चित्रपटांमध्ये भाग्यश्रीनं काम केलं आहे. तसेच तिनं देवों के देव...महादेव,सिया के राम या हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. देवयानी,जय देवा श्री गणेशा या मराठी या मराठी मालिकांमध्ये भाग्यश्रीनं महत्वाची भूमिका साकारली आहे. तसेच तिनं चिकाटी गाडीलो चिथाकोतुडू या तेलुगू चित्रपटात देखील काम केलं.

भाग्यश्री ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोंवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT