Bhupendra Jogi esakal
Premier

Bhupendra Jogi: एका डायलॉगमुळे रातोरात प्रसिद्ध झालेल्या भूपेंद्र जोगीवर हल्ला; पाठीवर आणि हाताला पडले 40 टाके

Bhupendra Jogi: दोन व्यक्तींनी भूपेंद्रवर हल्ला केला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

priyanka kulkarni

Bhupendra Jogi: 'नाम? भूपेंदर जोगी!', या एका मुलाखतीमधील डायलॉगमुळे रातोरात प्रसिद्ध झालेल्या भूपेंद्र जोगीवर (Bhupendra Jogi) जीवघेणा हल्ला झाला आहे. दोन व्यक्तींनी भूपेंद्रवर हल्ला केला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.या हल्ल्यात भूपेंद्र जखमी झाला आहे. तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

पाठीला आणि हाताला 40 टाके पडले

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडली आहे. युट्युबर भूपेंद्र जोगीचे न्यू मार्केट परिसरात रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. गेल्या मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो दुकानातून घरी परतत असताना रोशनपुराजवळ दोन तरुणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात भूपेंद्र जोगी गंभीर जखमी झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी जखमी भूपेंद्र जोगीला रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान भूपेंद्र जोगी यांच्या पाठीला आणि हाताला 40 टाके पडले आहेत.

अरेरा हिल्स पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप पोलिसांना गुन्हेगारांची कोणतीही माहिती मिळाली नाही. भूपेंद्र जोगीने दावा केला आहे की, त्याला दोनदा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भूपेंद्रचे कोणाशीही वैर किंवा वाद नाही, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

भूपेंद्र जोगीने त्याचे रुग्णालयातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये भूपेंद्र हा त्याची हेल्थ अपडेट देताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

कोण आहे भूपेंद्र जोगी?

'नाम? भूपेंदर जोगी!' या एका मुलाखतीमधील डायलॉगमुळे भूपेंद्र जोगी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. या डायलॉगचे रिल सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच या डायलॉगवर अनेक नेटकऱ्यांनी मीम्स देखील बनवले. या मीम्समुळे आणि व्हायरल झालेल्या रिलमुळे भूपेंद्र जोगीला लोकप्रियता देखील मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT