shefali jariwala  esakal
Premier

Shefali Jariwala: कधीही आई बनू शकत नव्हती शेफाली; स्वतः कारण सांगत म्हणालेली- माझ्यात आणि नवऱ्यात...

Shefali Jariwala On Motherhood: लोकप्रिय अभिनेत्री शेफाली जरीवाला हिने एका मुलाखतीत तिच्या आई न होऊ शकण्याचं कारण सांगितलं होतं.

Payal Naik

Shefali Jariwala On Having A Baby : 'काटा लगा' फेम शेफाली जरीवालाने ४२व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. तिच्या अशा अचानक निधनाने सगळ्यांना मोठा धक्का बसला. हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झालं. वयाच्या २० व्या वर्षी शेफालीने काटा लगा या गाण्यातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र तिच्या जाण्याची बातमी ऐकून सगळेच चकीत झालेत. तिने २०१४ मध्ये पराग त्यागीसोबत लग्नगाठ बांधली. मात्र लग्नाच्या १० वर्षांनंतरही आपण आई होऊ शकत नसल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं. आपल्याला आई व्हायचंय मात्र त्यात अडचणी येत असल्याचं ती म्हणाली.

शेफालीने पारस छाबडा याच्या युट्यूब चॅनेलवर हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना शेफाली म्हणाली, 'माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये वयाचं अंतर आहे त्यामुळे मला आई व्हायला अडचणी येत आहेत. आम्ही सगळं काही करून पाहिलं. खूप प्रयत्न केले. आता वाटतं की जेव्हा देवाची मर्जी असेल तेव्हाच आमच्या घरी बाळ येईल. मला आणि परागला एक मुलगी हवी आहे पण आता जे होईल ते होईल. जेव्हा मी १२- १३ वर्षांची होती तेव्हा मला दत्तक घेण्याचा विचार आला होता. दत्तक घेणं हा एक असा निर्णय आहे ज्यात तुमचं कुटुंब तुमच्यासोबत असलं पाहिजे. आमच्या घरी सगळे तयार आहेत. पण...'

ती पुढे म्हणाली, 'पण मुलं दत्तक घेण्याची प्रक्रिया ही खूप मोठी आहे. तेवढ्या वेळात मुलं मोठी होतात. आणि प्रत्येकाला एक छोटं बाळ हवं असतं. पराग आणि मी बऱ्याच काळापासून एक मूल दत्तक घेण्याचा विचार करतोय पण नाही होत आहे. अशी जगात अनेक बाळं आहेत ज्यांना एका घराची गरज आहे.' शेफालीने छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. शेफालीच्या निधनानंतर हिंदी कलाविश्वातील सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Nagpur Rural Development: ७९ वर्षांनंतरही स्वातंत्र्य आहे कुठे?; स्वातंत्र्याच्या अमृतकाळानंतरही मूलभूत सुविधांची ग्रामस्थांना प्रतीक्षा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

Independence Day Live Update : आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू, स्वातंत्र्यदिन कार्यालयातच साजरा

SCROLL FOR NEXT