Premier

Bigg Boss Season 18 : 'या' तारखेला येणार सलमानचा बिग बॉस सीजन १८ ; 'हा' आहे बिग बॉसच्या घरात जाणारा पहिला स्पर्धक

Bigg Boss 18 Update : बिग बॉस सीजन १८ ची तारीख जाहीर करण्यात आली असून त्यात स्पर्धक म्हणून जाणारा पहिला सेलिब्रिटी कोण असेल हे रिव्हील झालंय.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 18 Update : बिग बॉस ओटीटी सीजन ३ सध्या चर्चेत आहे आणि लवकरच या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार याची उत्सुकता असतानाच आता बिग बॉस सीजन १८ साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यातच आता बिग बॉस सीजन १८ कधी सुरु होणार याविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यंदाही अभिनेता सलमान खान बिग नव्या सीजनचं सूत्रसंचालन करणार आहे. याबरोबरच या शोमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचं नावही निश्चित करण्यात आलं आहे.

'द खबरी' च्या रिपोर्टनुसार, सलमानच्या घरावर एप्रिल महिन्यात झालेल्या गोळीबाराच्या धक्कादायक घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव सलमानने बिग बॉस ओटीटी च सूत्रसंचालन केलं नाही. त्यामुळे बिग बॉस ओटीटीचा नवा सीजन अनिल कपूर यांनी होस्ट केला. पण सलमान बिग बॉस सीजन १८ चं सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

द खबरी यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री दीपिका कक्कर चा नवरा आणि अभिनेता शोएब इब्राहिम बिग बॉस सीजन १८ मध्ये सहभागी होणार आहे. शोएब या शोमध्ये जाणार असल्याचं निश्चित झालं असून सध्या तो या शोची तयारी करत असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे त्याची पत्नी दीपिका बिग बॉस सीजन १२ ची विजेती होती. त्यामुळे शोएबही हा शो जिंकणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

शोएबने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'ससुराल सिमर का','इश्क में मरजावा','अजूनी' या मालिकांमध्ये शोएबने काम केलं आहे. याबरोबरच 'नच बलिये ८' आणि 'झलक दिखला जा' या सीजनमध्येही शोएब सहभागी झाला होता. गेल्या वर्षी शोएब आणि दीपिकाचा मुलगा रुहानचा जन्म झाला. त्यामुळे दीपिकाने अभिनयविश्वातून ब्रेक घेतला आहे.

याबरोबरच बिग बॉस १८ ची तारीखही जाहीर करण्यात आलीये. ५ ऑक्टोबर २०२४ पासून बिग बॉस चा १८ वा सीजन सुरु होतोय. ४ ऑगस्ट २०२४ ला बिग बॉस ओटीटी सीजन ३ चा फिनाले पार पडेल. आता या शोमध्ये विशाल कटारिया, अरमान मलिक, लव कटारिया, शिवानी कुमारी, सना मकबूल,रणवीर शौरी, कृतिका मलिक, नेझी आणि साई केतन राव हे स्पर्धक अजून टिकून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CP Radhakrishnan देशाचे १५ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Explained: CAD म्हणजे काय? जाणून घ्या हृदयशस्त्रक्रियेबाबतचे ७ मोठे गैरसमज आणि सत्य

Latest Marathi News Live Updates: पणन विभागाचीच माझ्याकडे अर्धी गर्दी - कृषिमंत्री भरणे

SCROLL FOR NEXT