bigg boss marathi 5 esakal
Premier

Bigg Boss Marathi: मला इथे नाही राहायचं! रडतच अभिनेत्रीने व्यक्त केली घरातून बाहेर जाण्याची इच्छा, रितेशने काय निर्णय घेतला?

Bigg Boss Marathi 5 latest Update: सध्या मराठी बिग बॉसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मात्र एका अभिनेत्रीने घरातून बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' ने सध्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा कार्यक्रम दिवसेंदिवस आणखीनच लोकप्रिय होत आहे. या सीझननेदेखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यात घरात दोन गट पडले आहेत. या आठवड्यातही भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने काही सदस्यांना त्यांची चूक दाखवून दिली. जान्हवी किल्लेकरला देखील या आठवड्यात खूप ऐकून घ्यावं लागलं आहे. मात्र भाऊच्या धक्क्यावर आणखी एक गोष्ट घडली आहे. घरातील एका सदस्याने घरातून बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपण इथे नाही राहू शकत असं ती व्यक्त म्हणाली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाण हिने घरातून बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. योगिता रितेशशी बोलताना म्हणाली, 'मला नाही माहीत मी कशी खेळतेय, चांगली की वाईट पण मला इथे नाही राहायचं. माझी चूक झाली. मी इथे आले. मी इथे यायलाच नको होतं. मला आता अनेकजण म्हणतील की तू आलीस का मग इथे? यायचं नव्हतं. हो मी मान्य करते माझं चुकलं. पण मला हे सहन नाही होत. मी इथे नाही राहू शकत. मला प्लिज बाहेर जायचंय. मला घरात राहायचं नाहीये. मला हा खेळ सोडायचा आहे.' असं म्हणत योगिता रडू लागली.'

त्यावर रितेश तिला समजावत म्हणाला, 'आता इथे कुणी राहायचं आणि कुणी नाही हे मी नाही ठरवू शकत हे जनता ठरवणार. तुम्हाला असं का वाटतंय माहीत नाही पण तुम्ही चांगलं खेळताय. अशाच खेळत राहा. आता तरी तुम्ही असं हे घर सोडून बाहेर जाऊ शकणार नाही.' त्यामुळे योगिताला असं मधेच बिग बॉस मराठीचं घर सोडून जात येणार नाहीये. तर दुसरीकडे चाहत्यांनीही प्रतिक्रिया देत ती चांगली खेळतेय. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. घाबरू नको असं म्हणत तिला धीर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : 40 वर्षे लढून मिळवलेल्या कोल्हापूर सर्कीट बेंच विरोधात याचिका, पण एका सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण निकाली

Sahyadri Tiger : ताडोबासारखे सह्याद्री व्याघ्र दर्शन कधी? जंगल सफारीची वाढती मागणी

'नितीश कुमारजी तुमचं धोतर खेचलं तर...' बुरखा खेचण्यावरुन राखी सावंत भडकली, जाहीर माफीची केली मागणी

तुझा फोन पडला, तर मला सांगू नको... Jasprit Bumrah ची चाहत्याला तंबी अन् मग हिसकावला मोबाईल; Viral Video

भाडं मागायला आली मालकीण, भाडेकरू दाम्पत्यानं गळा दाबून संपवलं; सूटकेसमध्ये लपवला मृतदेह

SCROLL FOR NEXT