bigg boss marathi 5 esakal
Premier

Bigg Boss Marathi 5: जिंकलीस पोरी! लेकीसाठी पहिल्यांदा मुंबईत आला बाबा; अंकिताची आर्त हाक ऐकून नेटकरी शहारले

Ankita Walawalkar Father Entry In Bigg Boss House: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मध्ये या आठवड्यात फॅमिली वीक साजरा केला जातोय.

Payal Naik

Latest Marathi Entertainment News Updates: 'बिग बॉस मराठी ५' मध्ये या आठवड्यात फॅमिली वीक साजरा करत आहेत. आता हा कार्यक्रम संपायला फक्त काही दिवस बाकी आहेत. ६ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. या दिवशी 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता जाहीर होणार आहे. त्यापूर्वी घरात फॅमिली वीक साजरा होतोय. घरात असलेल्या स्पर्धकांचे कुटुंबीय आता त्यांना भेटायला येत आहेत. यापूर्वी अभिजित सावंत, धनंजय पोवार यांचे कुटुंबीय घरात आले होते. आता अंकिता वालावलकर हिच्या कुटुंबीयांची घरात एंट्री झाली आहे. महत्वाचं म्हणजे तिचे बाबादेखील घरात येत आहेत. त्यांचा व्हिडिओ पाहून आता नेटकरीही भावुक झाले आहेत.

अंकिता आणि घरच्यांचा एक व्हिडिओ चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे ज्यात अंकिताच्या बहिणी सगळ्यात आधी घरात येताना दिसतात. त्यांना पाहून अंकिताला रडू फुटतं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा बिग बॉस अंकिताला फ्रिज व्हायला सांगतात. तेव्हा मात्र घरात अंकिताचे वडील घरात एंट्री करतात. त्यांना पाहून अंकिताचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. तिचे बाबा यापूर्वी कधीही मुंबईत आले नव्हते. अंकिताने त्यांना मुंबईत आणण्याचे खूप प्रयत्न केले होते. मात्र त्यांनी नेहमीच नकार दिला होता. आता मुलीसाठी ते मुंबईत आले. वडील घरात येताना अंकिता त्यांना बाबा म्हणून आर्त हाक मारते. जी ऐकून नेटकऱ्यांच्याही अंगावर शहारे आले आहेत.

नेटकरीही त्यावर आता प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, 'बाबांना मुंबई मधे आणलस. तू जिंकलीस... हेच हवं होत आम्हाला. हेच बघायचं होतं'. आणखी एकाने लिहिलं, 'एक मालवणी पोरिक असा आपल्या बाबांना मोठ्या पडद्यावर वर आणला हीच मोठी गोष्ट असा आम्हा मालवणी लोकांना साठी. गो जिंकलास पोरी.' दुसऱ्याने लिहिलं, 'अंकिता तुझ्यासारखी मुलगी प्रत्येकाला मिळो. तुझे संस्कार बघून डोळ्यात पाणी येतं गं. खूप प्रामाणिक खेळली. अशीच प्रामाणिक राहा आयुष्यात.' आणखी एकाने लिहिलं, 'श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT