arbaz patel  esakal
Premier

Bigg Boss Marathi 5: मराठी अभिनेत्रीने मांडली महाराजांचा जयजयकार न करणाऱ्या अरबाजची बाजू; म्हणते- यात त्याची काय चूक

Pranit Hate On Arbaz Patel Controversy: काही दिवसांपूर्वी तापलेल्या अरबाज पटेल मुद्द्यावर आता मराठी अभिनेत्रीने आपलं मत मांडलं आहे.

Payal Naik

Arbaz Patel In Bigg Boss Marathi: सध्या सगळीकडे 'बिग बॉस मराठी ५'ची चर्चा आहे. घरात कोण राहणार आणि कोण जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पहिल्या आठवड्यात कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर झाले. मात्र तेव्हाच घरातील अरबाज पटेल या सदस्याने केलेल्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पुरुषोत्तम हे घरातून निघताना राम कृष्ण हरी आणि छत्रपतींचा जयजयकार करत बाहेर पडले. मात्र अरबाज यादरम्यान सुरुवातीपासून शांतपणे हाताची घडी घालीन उभा होता. त्याने घोषणा न दिल्याने अनेक नेटकऱ्यांनी त्याला आणि वाहिनीला धारेवर धरलं. मात्रवत एका मराठी अभिनेत्रीने यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

'कारभारी लयभारी' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री गंगा म्हणजेच प्रणित हाटे हिने एक व्हिडिओ शेअर करत याप्रकरणात आपलं मत मांडलं आहे. आपण अरबाजचं मुळीच समर्थन करत नाही पण त्याने महाराजांचा अपमान केलेला नाही असं ती म्हणाली आहे. या व्हिडिओत बोलताना प्रणित म्हणाली, 'नमस्कार मी गंगा. नुकतंच ‘बिग बॉस मराठी’मध्ये एलिमिनेशन झालं. तेव्हापासून सर्वत्र एक चर्चा रंगलेली आहे. मी आधी बोलण्यापूर्वी स्पष्ट करते की, मी कोणत्याच जातीला समर्थन देत नाहीये किंवा माणसाला समर्थन देत नाहीये. इथे फक्त मत मांडते आहे. जेव्हा संतांना, थोर पुरुषांना, छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जात होती. यावेळी अरबाज तिथे काही बोलला नाही.'

ती पुढे म्हणाली, 'मला असं वाटतं, जर त्या जागी त्याच्या धर्माचं काहीतरी असतं. कोणत्या तरी मोहब्बदाला मानवंदना दिली असती, त्यांच्या मुस्लीम धर्माचं जे काही असतं किंवा नारेबाजी दिली असती तर आपल्यापैकी किती जणांनी पुढे येऊन जयघोष केला असता. प्रत्येकजण आपली संस्कृती, आपले विचार जपत असतो . त्याने असं वेगळं वागून अपमान नाही केलाय. मला नाही वाटतं, आपण एवढं त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. लोक म्हणतात, तो मराठी बिग बॉसमध्ये का आलाय? तर हा प्रश्न क्रिएटिव्ह आणि चॅनलला विचारायला पाहिजे. त्याची यात काय चूक आहे. माहितीसाठी, मी काही अरबाजला समर्थन देत नाही.' यापूर्वी प्रणितने वर्षा उसगावकर यांच्या अपमानाविरुद्धदेखील आवाज उठवला होता आणि निकीला खडेबोल सुनावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म चोरीला - अनिल देसाई

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT