bigg boss marathi 5 esakal
Premier

ती कुठेय? सगळे आले पण ती नाही दिसली, बिग बॉस मराठीचा प्रोमो पाहून नेटकरी करतायत तिची चौकशी

Bigg Boss Marathi 5 Latest Promo Went Viral: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यापूर्वी एक प्रोमो व्हायरल करण्यात आला आहे.

Payal Naik

'बिग बॉस मराठी ५' सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर या कार्यक्रमाची एकच चर्चा होती. आता अखेर कार्यक्रमाचे शेवटचे काही तास उरले आहेत. उद्या ६ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. संध्याकाळी ६ वाजता हा फिनाले पार पडणार आहे. त्यापूर्वी वाहिनीकडून एक खास गोष्ट करण्यात आली आहे. आज घरातून बाहेर गेलेले सदस्य पुन्हा एकदा आपल्या मित्रमैत्रिणींना भेटायला घरात येणार आहेत. अरबाज तर अगदी धावतच येऊन निक्कीला उचलून घेतो. हा प्रोमो पाहून नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र या प्रतिक्रियांमध्ये नेटकरी तिच्याबद्दलही चौकशी करत आहेत. घरात सगळे सदस्य परत आले असताना ती मात्र प्रोमोमध्ये दिसत नाहीये. ती स्पर्धक आहे आर्या जाधव.

कलर्स वाहिनीने शेअर केलेला प्रोमो पाहून नेटकरी आता आर्या बद्दल विचारणा करत आहेत. या प्रोमोमध्ये जवळपास सगळेच स्पर्धक दिसत आहेत. योगिता चव्हाण, निखिल दामले, पुरुषोत्तम दादा पाटील, वर्षा उसगावकर, संग्राम जाधव सगळेच दिसत आहेत. मात्र आर्या या प्रोमोमध्ये कुठेही दिसत नाहीये. त्यामुळे नेटकरी आता तिच्याबद्दल विचारणा करत आहे. तिला बोलावलं का नाही, असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत. तर आर्याने दिलेल्या मुलाखतीत तिने मी पुन्हा कधीही 'बिग बॉस मध्ये पाय ठेवणार नाही असं म्हंटलं होतं. तर तिच्या वडिलांनीही माझ्या मुलीवर निक्कीची सावलीही पडायला नको असं सांगितलं होतं. त्यामुळे आता आर्या स्वतःहून आली नाही असंही काही नेटकरी सांगत आहेत.

याचा अर्थ आर्या बिग बीसच्या ग्रँड फिनालेला देखील असण्याची शक्यता कमी आहे. बिग बॉस मराठीच्या या पर्वात वर्षा उसगांवकर, निखिल दामले, अंकिता प्रभू वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरोडे, इरिना रुडाकोव्हा, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, पुरुषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण हे १६ स्पर्धक सहभागी झाले होते. तर संग्राम जाधव याची वाइल्ड कार्ड म्हणून एंट्री झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT