arbaz patel  esakal
Premier

Exclusive: त्या दिवशी छत्रपतींचा जयजयकार न करण्यावर अरबाज पटेलने दिलं उत्तर; माफी मागत म्हणाला- बाहेर तसं वाटलं पण...

Bigg Boss Marathi 5 Arbaz Patel Talked On Chanting Chhatrapati Shivaji Maharaj: छोट्या पाड्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मधून बाहेर पडलेला अरबाज पटेल याने सकाळला दिलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे.

Payal Naik

'बिग बॉस मराठी ५' सध्या प्रचंड गाजतोय. सोशल मीडियावरच नाही तर सगळीकडेच बिग बॉस मराठीच्या या सिझनची चर्चा आहे. या वेळेस हा सीझन वेळेच्या आधीच बंद करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. मात्र त्यामुळे चाहते आणि स्पर्धक दोघेही गोंधळले आहेत. त्यात मागील आठवड्यात हाताला झालेल्या दुखापतीमुळे संग्राम चौगुले बाहेर गेला त्यानंतर एलिमिनेट होऊन अरबाज पटेलही घराबाहेर झाला. आता घराबाहेर झालेल्या अरबाजने दिलेली मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. यात त्याने घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार ना करण्याचं कारण सांगितलं आहे.

अरबाजने नुकतीच सकाळ प्रीमिअरला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं की जेव्हा पुरुषोत्तम दादा घराबाहेर जात होते तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. तेव्हा तू नुसता उभा होतास. तू घोषणा का दिल्या नाहीस? यावर अख्खा महाराष्ट्र नारा झाला. यावर उत्तर देताना अरबाज म्हणाला, 'हे सगळं कधी घडलं मला माहीत नाही. कारण मी तसा नाहीये. संभाजी नगरमध्ये मी राहतो. सगळ्यांना माहितीये ती जागा ऐतिहासिक आहे. तिथून शिवाजी महाराजांच्याबद्दल खूप ऐकलंय. आपण आज त्यांच्यामुळेच आहोत. त्यांच्यासोबत आपण काम केलंय. तेव्हाची जी लोकं होती त्यांनी महाराजांच्या पाठीला पाठ लावून काम केलंय.'

खरंच असं काही नाहीये

तो पुढे म्हणाला, 'मी घरात माझ्याच विचारात होतो. हे सगळं कधी घडलं मी ऐकलंच नाही. काय सुरू होतं. आणि पुरुषोत्तम दादांना मीच नॉमिनेट केलेलं. त्यामुळे तो एक विचार माझ्या मनात सुरू होता. धर्म धरून राहिलो असतो तर मी मराठी बिग बॉस मध्ये कशाला आलो असतो. मी हेच सांगितलं असतं अरे मराठी बिग बॉस आहे मला नाही जायचं तिकडे पण नाही. मी तसा व्यक्ती नाहीये. मी सगळ्याच धर्माच्या बाबतीत पझेसिव्ह आहे. तसं काही नाहीये. जर लोकांना तसं वाटलंय तर मी माफी मागतो तुमची. पण खरंच असं काही नाहीये.' असं म्हणत अरबाजने त्या प्रकरणी सगळ्यांची माफी मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT