pandharinath kamble  esakal
Premier

आपल्यापेक्षा उंच मुलगी पाहून कांदेपोहे कार्यक्रमात गोंधळलेला पॅडी, होणाऱ्या बायकोने दिलेलं मन जिंकणारं उत्तर

Pandharinath Kamble Untold Story: लोकप्रिय मराठी अभिनेता पंढरीनाथ कांबळे याने एका मुलाखतीत त्याच्या कांदापोह्यांच्या कार्यक्रमाचा धमाल किस्सा सांगितला आहे.

Payal Naik

आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता पंढरीनाथ कांबळे म्हणजे चाहत्यांचा लाडका पॅडी सध्या 'बिग बॉस मराठी ५' मध्ये धुमाकूळ घालताना दिसतोय. पहिल्या आठवड्यात त्याने रितेशचा ओरडा खाल्ला असला तरी दुसऱ्या आठवड्यात तो चांगला खेळताना दिसतोय. हळूहळू त्याला हा खेळ समजू लागला आहे. त्यातच आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासही चाहते उत्सुक आहेत. पंढरीनाथचं लग्न झालं असून त्याच्या पत्नीचं नाव अनिता आहे. मात्र जेव्हा अभिनेता आपल्या होणाऱ्या बायकोला पाहायला गेला होता तेव्हा एक मोठी गम्मत घडली होती.

पंढरीनाथ आणि अनिता यांचं अरेंजमरेज. त्यांचा कांदेपोह्यांचा कार्यक्रमही झाला. अभिनेता जेव्हा तिला बघायला गेला तेव्हा त्याच्यासोबतच त्याचे भाऊ, आत्या अशी बरीच मंडळी गेली. जेव्हा अनिता चहा घेऊन आली तेव्हा तिने पॅडीजवळ चहाचा ट्रे नेला मात्र तो लगेच दुसरीकडे वळवला. मोठ्यांना आधी चहा देऊ असा विचार तिने केला. तेव्हा पॅडीचा गोंधळ झाला. त्यानंतर कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाल्यावर अभिनेत्याने तिला त्याची उंची सांगितली. पॅडीची पत्नी त्याच्यापेक्षा २ इंच उंच आहे. त्यामुळे तिला याबद्दल आधी सांगणं त्याला गरजेचं वाटलं.

या कार्यक्रमात पॅडी तिला म्हणाला, 'माझी उंची ५ फूट १ इंच वगरे आहे. तू उंच आहेस. तेव्हा आताच विचार कर. नाहीतर तुला पुढे तुला नवरा बुटका आहे असं नको वाटायला. यावर अनिताने त्याला सरळ उत्तर देत म्हटलं, 'उंची वगरे काही नसतं. माणसाचे विचार जुळणं गरजेचं आहे. तुमचे आणि माझे विचार जुळणं गरजेचं आहे.' हा किस्सा पंढरीनाथ यांनी अलका कुबल यांच्या दर्शन या कार्यक्रमात सांगितला होता. पंढरीनाथ यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT