bigg boss marathi 5  esakal
Premier

Bigg Boss Marathi 5: अंकिता, योगिता, धनंजय की पुरुषोत्तम, पहिल्याच आठवड्यात हा सदस्य होणार घराबाहेर? वाचा वोटिंग ट्रेंड

Bigg Boss Marathi 5 Elimination Voting Trends: बिग बॉस मराठी ५' मध्ये आज भाऊचा धक्काचा दुसरा दिवस आहे. आज एक सदस्य घराबाहेर होणार आहे.

Payal Naik

BB Marathi 5 Elimination: लोकप्रिय मराठी कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' ची जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच आठवड्यात घरात मोठे राडे झाले. अनेक जण आपली बाजू मांडताना दिसले तर काही घरात असूनही दिसण्यात आले नाही. कुणी मुद्दाम दुसऱ्या सदस्यांना त्रास दिला तर कुणी ग्रुप बनवले. या आठवड्यात पहिलाच भाऊंचा धक्का सुरू आहे. त्यावर रितेश देशमुखने सगळ्यांची जोरदार शाळा घेतली. निक्कीच्या वागण्यावर तिला सुनावलं तर जान्हवी आणि अंकितालादेखील चांगलंच धारेवर धरलं. या सगळ्यात आणखी एका गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे या आठवड्यात कोण घराबाहेर होणार. काय सांगतायत या आठवड्याचे ट्रेंड?

या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये घरातील सहा सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यात सुरज चव्हाण, वर्षा उसगावकर, धनंजय पवार, अंकिता वालावलकर, योगिता पवार आणि पुरुषोत्तम पाटील यांचा समावेश होता. आता त्यातील दोन सदस्यांना प्रेक्षकांनी सेफ केलं आहे. सगळ्यात जास्त मतं पडली ती सुरज चव्हाण याला. त्यानंतर महाराष्ट्राच्या लाडक्या वर्षा उसगावकर यांनी दुसरा क्रमांक पटकावला. हे दोघेही सेफ झाले. मात्र इतर चार सदस्यांवर अजूनही नॉमिनेशनची तलवार आहे. त्यातील सगळ्यात जास्त मतं मिळवून धनंजय पोवार पुढे आहेत. त्यानंतर अंकिता वालावलकर हिने नंबर लावला आहे.

त्यामुळे या आठवड्यात योगिता पवार आणि पुरुषोत्तम दादा पाटील हे दोघे बॉटम २ मध्ये आहेत. आता त्यातल्या पुरुषोत्तम दादा पाटील यांना सगळ्यात कमी मतं मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्या घराबाहेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वोटिंग ट्रेंड्स जरी हे सांगत असले तरी आता या आठवड्यात कोण घराबाहेर होणार ते जाणून घेण्यासाठी भाऊंचा धक्का पाहावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Farmers Protest : 'दांडके पाठीत फोडू, वेळ पडली तर बलिदानही देऊ, पण वाडवडिलांची जमीन...; शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध

Mass Marriage Ceremony : आख्खा गावात लगीन घाई, गावाला आले यात्रेचे स्वरूप; निमगावात सात जोडपे विवाहाच्या पवित्र बंधनात बांधले गेले

Latest Marathi News Live Update : जिल्हा कारागृहातील कैद्याचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

Kolhapur Crime News, : 'माझ्या मुलाला फाशी द्या..'; प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे शोषण, शाहिद सनदीच्या वडिलांनी मागितली गावकऱ्यांची माफी

पोलिसांवर आली 'धक्का' मारण्याची वेळ! कैद्यांनी भरलेली बस भररस्त्यात पडली बंद अन्...

SCROLL FOR NEXT