bigg boss marathi 5 esakal
Premier

Bigg Boss Marathi 5: गेम नाही कळला पण माणसं कळली! सुरजला कचरा काढताना पाहून अंकिता, पॅडी भावुक, म्हणतात-

Bigg Boss Marathi Suraj Chavan Video: छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणाऱ्या 'बिग बॉस मराठी ५' चा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दररोज नवनवे ट्विस्ट येत आहेत. या घरात प्रत्येकजण ती बिग बॉसची ट्रॉफी जिंकायला आला आहे. घरात यावेळेस वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं आली. काही कलाकार तर काही कीर्तनकार आणि त्यांच्यासोबतीला कन्टेन्ट क्रिएटर. हा खेळ समजून घेणं तसं अवघडच आहे. एकमेकांच्या डोक्यावर पाय देत पुढे जाणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. काही माणसं ही मुळातच हळवी असतात. असाच एक हळवा माणूस या घरात गेलाय ज्याला छक्के पंजे जमत नाहीत. तो म्हणजे गुलीगत धोका फेम सुरज चव्हाण. त्याचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून नेटकरीही भावुक झाले आहेत.

वाहिनीच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात सुरज कचरा काढताना दिसत आहे. आणि त्याला असं पाहून पंढरीनाथ कांबळे आणि अंकिता वालावलकर भावुक झाले आहेत. या व्हिडिओमध्ये सूरज त्याला दिलेली आठवड्याची ड्युटी करताना दिसतोय. त्याला बाहेरचा कचरा काढण्याचं काम दिलं आहे. तो कचरा काढत असताना अंकिता म्हणते याला असं बघून मला कसं तरी वाटतंय. त्यावर पॅडी म्हणतो, एरवी पण बिचारा तेच काम करत असणार बाहेर. तो काल मला म्हणाला, दादा मला लय वाईट वाटतं तुम्ही खाली झोपता आणि मी वर बेडवर झोपतो. त्यावर अंकिता म्हणते भले त्याला गेम नाही कळला पण त्याला माणसं कळली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

यावर नेटकरीही सूरजची बाजू घेत आहेत. त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तो खूप साधा आहे. तुम्ही कुणीही त्याला नॉमिनेट केलं तरी आम्ही त्याला घरातून बाहेर येऊ देणार नाही असं ते म्हणत आहेत. सूरजला खोटं वागता येत नाही म्हणून तो लाखोंच्या मनावर राज्य करतोय. हा व्हिडिओ पाहून अक्षरश अंगावर काटा आला, खूप माणुसकी आहे सुरज मध्ये, सुरज तू पूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं, तुझ्यामुळे जे बिग बॉस पाहत नव्हते ते बिग बॉस पाहायला लागले अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Yogeshwar Dutt : "ऑलिंपिक पदक हवे असेल तर मॅटवर उतरा!"; योगेश्वर दत्त यांचा महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंना मोलाचा सल्ला

Baba Venga Predictions 2026: जगाला मोठ्या संकटाचा सामना, निर्णयक्षमता हरवेल... पृथ्वीवर परग्रहवासी येणार?

Mumbai Mahayuti Manifesto : महायुतीचा वचननामा जाहीर; मराठी माणसाला मुंबईतच घर ते बेस्ट प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत अन् बरंच काही...

Sunil Tatkare : नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी 'महायुती'ला साथ द्या; सुनील तटकरेंचे नाशिककरांना आवाहन

SCROLL FOR NEXT