bigg boss marathi 5 esakal
Premier

Bigg Boss Marathi Voting Trends: 'हा' सदस्य होणार घराबाहेर; मिळालेत सगळ्यात कमी वोट्स, बीबी मराठीला मिळणार टॉप ६ स्पर्धक

Bigg Boss Marathi 5 Eviction : यापूर्वी 'बिग बॉसच्या घरातून अंकिता प्रभू वालावलकर बाहेर निघाल्याचा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्या अफवा होत्या.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मधून आज शेवटचं एव्हिक्शन होणार आहे. आज मिड वीक एव्हिक्शन पार पडणार आहे. आज घराबाहेर जाण्याच्या यादीत एकूण सहा सदस्य आहेत. त्यातील एक स्पर्धक आज घराबाहेर होणार आहे. तर आज या सिझनचे टॉप ६ स्पर्धंक जाहीर होणार आहेत. तर ६ ऑक्टोबर रोजी या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडेल. यात या सीझनचा विजेता जाहीर करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी कोणता सदस्य घराबाहेर होणार आहे हे पाहूया.

'बिग बॉस मराठी ५' च्या फॅन पेजवर सध्याचे वोटिंग ट्रेंड जाहीर करण्यात आले आहेत. या ट्रेण्डनुसार या आठवड्यात प्रेक्षकांना आपल्या आवडत्या स्पर्धकाला वोट करण्यासाठी केवळ तीन दिवस देण्यात आले होते. त्यामध्ये सगळ्यात जास्त वोटिंग हे सुरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर यांना आहे. सुरज आणि अंकिता याना जवळपास सेम वोटिंग मिळाले आहेत. तर त्याच्या खालोखाल अभिजित सावंत आणि धनंजय पोवार आहेत. या दोघांनाही जास्त मतं मिळाली आहेत. त्यामुळे हे चार सदस्य आता सेफ आहेत. मात्र राहिलेले दोन सदस्य आता डेंजर झोनमध्ये आहेत.

हे आहेत बॉटम २

वर्षा उसगावकर आणि जान्हवी किल्लेकर यांना सगळ्यात कमी वोट्स मिळाले आहेत. त्यातही वर्षा यांना कमी वोट मिळाले आहेत. फॅन पेजच्या माहितीनुसार, वर्षा उसगावकर या घरातून बाहेर झाल्या आहेत. त्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. मात्र जान्हवी बद्दल अजूनही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर आज फक्त एकच एव्हिक्शन होणार की दोन सदस्य घराबाहेर होणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. एकच एव्हिक्शन झाल्यास घराला आज सीझनचे टॉप ६ स्पर्धक भेटणार आहेत. हे स्पर्धक थेट अंतिम फेरीमध्ये दाखल होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT