bigg boss marathi 5 sakal
Premier

Bigg Boss Marathi 5:'बिग बॉस मराठी ५'मध्ये दिसणार छोट्या पडद्यावरील 'हे' लोकप्रिय अभिनेते? आणखी दोन नावांची जोरदार चर्चा

Bigg Boss Marathi 5 New contestants name: 'बिग बॉस मराठी ५' साठी आता आणखी दोन कलाकारांची नावं समोर आली आहेत. यापूर्वी कोकण हार्टेड गर्लचं नाव समोर आलं होतं.

Payal Naik

सध्या 'बिग बॉस मराठी ५'च्या जोरदार चर्चा आहेत. प्रेक्षक 'बिग बॉस मराठी ५'ची आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर जवळपास वर्षभरानंतर हा बिग बोस मराठीचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सीझनमध्ये नवीन काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. त्यात बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन आता महेश मांजरेकरांऐवजी अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. येत्या २८ जुलै पासून बिग बॉस मराठीचा ५ वा सीझन सुरू होणार आहे. त्यातच या सीझनमध्ये कोणकोणते चेहरे पाहायला मिळणार यांचीही नेटकऱ्यांना उत्सुकता आहे. त्यात आता आणखी दोन अभिनेत्यांच्या नावाची चर्चा आहे.

यापूर्वी लोकप्रिय इन्फ्ल्यूएंसर अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल या सीझनमध्ये दिसणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. आता तिच्यापाठोपाठ आणखी दोन नावं समोर आली आहेत. बिग बॉस मराठी ५ साठी छोट्या पडद्यावरील दोन लोकप्रिय अभिनेत्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातील पहिलं नाव आहे अभिनेता चेतन वडनेरे. चेतन यापूर्वी 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत दिसला होता. त्याने ;फुलपाखरू' या मालिकेतही काम केलं होतं. मात्र ठिपक्यांची रांगोळी मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आता तो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये दिसणार असल्याचं बोललं जातंय.

ता दुसरं नाव आहे अभिनेता विवेक सांगळे. विवेक कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत दिसला होता. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेपूर्वी त्याने 'काळूबाई माझी आई' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. आता विवेक बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. एका इंस्टाग्राम पेजने याबद्दल माहिती दिली आहे. २८ जुलै रोजी 'बिग बॉस मराठी ५'चा ग्रँड प्रीमिअर सोहळा पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT