bigg boss marathi 5  esakal
Premier

BB Marathi: बिग बॉसच्या घरात राडा, नॉमिनेशन टास्कवरून निकी- अंकिता भिडल्या,नेटकऱ्यांनी घेतली कोकणच्या चेडवाची बाजू

Bigg Boss Marathi 5 New Promo: 'बिग बॉस मराठी ५' मध्ये आता पुन्हा एकदा राडा झाला आहे. यावेळेस निकी तांबोळी आणि अंकिता वालावलकरमध्ये भांडण झालं आहे.

Payal Naik

Bigg Boss Marathi Niki vs Ankita: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो आता समोर आला आहे. यावेळेस घरात वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती दिसत आहेत. कीर्तनकारांपासून ते कन्टेन्ट क्रिएटर्सपर्यंत सगळेच या वेळेस एकमेकांशी भिडणार आहेत. अशात आता पहिल्या आठवड्यातील नॉमिनेशनचं बिगुल वाजलं आहे. पहिल्या आठवड्याच्या नॉमिनेशनसाठी आता पहिला टास्क देण्यात आला आहे. याच टास्कदरम्यान निकी तांबोळी आणि अंकिता वालावलकर एकमेकांशी भिडताना दिसणार. त्यांच्या वादात आता बहुतेक नेटकऱ्यांनी अंकिताची बाजू घेतली आहे.

धक्का देऊ नको गं

कलर्स मराठीने आजच्या भागाचा एक नवाकोरा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये घराबाहेर जाण्याच्या पहिल्या नॉमिनेशन टास्कसाठी घरातले सदस्य एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. त्यात अंकिता आणि निकी एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत. या टास्कदरम्यान निकी अंकिताला धक्का देताना दिसते त्यामुळे अंकिता तिला दूर ढकलत धक्का देते आणि तू धक्का देऊ नको ग असं म्हणते. त्यानंतर पुन्हा निकी तिच्या अंगावर ओरडत तिला धक्का देत मला स्पर्श करायचा नाही असं म्हणते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या वादावर आता नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनेक नेटकऱ्यांनी आता निकी तांबोळीच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर अंकिताची बाजू घेतली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, 'निकी नुसती ओव्हर ऍक्टिंग आहे. खूप गर्व आहे तिला. तिला जरी टीआरपीसाठी घेतलं असलं तरी ती असं नाही वागू शकत. या हिंदी वाल्यांना का घेतलंय घरात. सतत भांडत असते.' आणखी एकाने लिहिलं, 'अंकिता तिला चांगला इंगा दाखव. त्या निकीला बोलण्याची पद्धत नाहीये. आधी वर्षा उसगावकर यांना टार्गेट करत होती. आता तिला करतेय. वर्षा यांच्यासोबत अरबाज आणि बाकीच्यांनी देखील नियम तोडला होता मागती त्यांना का नाही बोलली?' आणखी एकाने लिहिलं, 'निकेल इथून बाहेर काढा आधी.' आता या आठवड्यात घरातून कोण जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

Palghar Bribery case: पालघरमध्ये आरोग्य अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, 35 हजार स्विकारत हाेते अन् काय घडलं!

Dharshiv Hailstorm News: लातूर-धाराशिवमध्ये गारपीटीचा कहर; शेती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा तडाखा!

Malkapur Accident: कंटेनरखाली चिरडल्याने दुचाकीस्वार ठार; मलकापूरजवळ अपघात, कंटेनरच्या वेगानं हाेत्याचं नव्हतं झालं!

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

SCROLL FOR NEXT