bigg boss marathi 5 esakal
Premier

BB Marathi 5: घरात आलेल्या आईने निक्कीला सांगितलं अरबाजचं ते सत्य; धक्का बसलेल्या निक्कीने थेट...

Nikki Tamboli Mother Talked About Arbaz Patel: 'बिग बॉस मराठी ५' च्या फॅमिली वीकमध्ये घरात निक्कीची आई येणार आहे. ती मुलीला अरबाजबद्दल एक सत्य सांगणार आहे.

Payal Naik

कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी ५ मध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे. आता बिग बॉस मराठीचे शेवटचे काही दिवस उरले आहेत. ६ ऑक्टोबर रोजी या सीझनचा शेवट होणार आहे. मात्र त्यापूर्वी घरात सर्व सदस्यांचे कुटुंबीय येणार आहेत. यापूर्वी जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर यांचे कुटुंबीय घरात येऊन गेले आहेत. मात्र आता निक्की तांबोळी हिच्या आईची घरात एंट्री होणार आहे. ती आपल्या लेकीला अरबाज पटेलबद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकून निक्की चांगलीच संतापणार आहे.

'बिग बॉस मराठी ५' या कार्यक्रमात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या जोडीची जोरदार चर्चा होती. निक्की आणि अरबाज एकमेकांना आवडत आहेत असं चित्र होतं. मागच्याच आठवड्यात अरबाज घराबाहेर झाला. मात्र त्यानंतर निक्कीने अरबाजच्या काही वस्तू सांभाळून ठेवल्या होत्या. ती अरबाजच्या कॉफी मग मधूनच कॉफी प्यायची. आता निक्कीची आई घरात येतेय. त्या आपल्या मुलीला अरबाजचं एक सत्य सांगतात. त्या म्हणतात, 'अरबाज चुकीचा चालला आहे. त्याने असं नाही करायला पाहिजे होतं. त्याचा साखरपुडा झालाय असं म्हणतात.' त्यावर निक्की जोरात ओरडून विचारते, कुणाचा? आई म्हणते अरबाजचा. त्यावर निक्कीच्या रागाचा पारा चांगलाच चढतो.

त्यानंतर निक्की बिग बॉसला म्हणते, जर अरबाज आता घरात आला ना तर मी खरंच पागल होईन. अरबाज निक्की जे होतं ना ते आता संपलंय.' त्यानंतर निक्की घरातले अरबाजचे कपडे आणि कॉफी मग एका कचऱ्याच्या पिशवीत भरते आणि रूममध्ये ठेवून येते. बिग बॉसला ते कपडे फेकून द्यायला सांगते. यावर नेटकरीही आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Aqua Line: मुंबईमध्ये धावत्या भूमिगत मेट्रोत उडाल्या ठिणग्या; प्रवाशांत घबराट अन्...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार? 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने महिलांमध्ये खळबळ

तुझे न्यूड फोटो पाठवशील का? अक्षय कुमारच्या १२ वर्षाच्या मुलीला आला घाणेरडा मेसेज; अभिनेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं

Cough Syrup Deaths : 'कफ सिरप'ने घेतला 12 बालकांचा जीव, पाच मुले गंभीर; औषधात आढळला विषारी घटक, नागपूर प्रयोगशाळेत झाली महत्त्वाची चाचणी

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

SCROLL FOR NEXT