bigg boss marathi 5 esakal
Premier

Bigg Boss Marathi 5: अंकिताला ट्रोल करणारे आता कुठे गेले? सुरजचा जान्हवीसोबतचा वाईट खेळ पाहून नेटकरी भडकले

BB Marathi 5 Audience Angry On Suraj: कालचा खेळ पाहून नेटकरी सुरजला ट्रोल करत आहेत. त्याने टास्कमध्ये जे केलं ते नेटकऱ्यांना मुळीच आवडलेलं नाही.

Payal Naik

Latest Marathi Entertainment Updates: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी ५ मध्ये आता शेवटचे २ आठवडेच उरले आहेत. या आठवड्यात सगळेच सदस्य बाहेर जाण्यासाठी नॉमिनेटेड आहेत. अशातच घरात एक नवा टास्क खेळला गेला. बिग बॉसने या सीझनची प्राइझ मनी सांगितली आणि ती मिळवण्यासाठीचा मार्गही सांगितला. त्यापूर्वी एक खेळ खेळण्यात आला. मात्र या खेळात सुरज चव्हाण ज्या पद्धतीने खेळला ते पाहून नेटकरीही चकीत झाले. त्याचा खेळ अनेकांना आवडला नाही. त्याचा सामना जान्हवीसोबत सोबत होता. या टास्कमुळे आता सुरज सोशल मीडियावर ट्रोल होतोय तर जान्हवी आणि अंकिताच्या खेळाचं कौतुक केलं जातंय.

नेमकं काय घडलं?

बिग बॉसने घरातल्यांना एक टास्क दिला होता ज्यात सुरजच्या विरुद्ध जान्हवी किल्लेकर होती. या टास्कमध्ये स्पंजचे ठोकळे जास्तीत जास्त गोळा करायचे होते आणि स्वतःची संख्या वाढवायची होती. मात्र हा टास्क सूरजला समजलाच नव्हता. त्यानंतर जेव्हा धनंजय यांनी सुरजला समजावलं तेव्हा त्याने पूर्ण ताकदीनिशी हा टास्क खेळायला सुरुवात केली. मात्र त्यात तो जान्हवीसोबत खूप वाईट पद्धतीने खेळताना दिसला. त्याने आपल्या ताकदीचा पूर्ण उपयोग केला होता. तो तिला खेचताना दिसला. मात्र जान्हवीची तिच्या जागी अडून बसली होती. जान्हवीने सुरजला दिलेली टक्कर अनेकांच्या पसंतीस उतरली. अनेकांनी तिचं कौतुकही केलं.

bb marathi 5
bb marathi 5

नेटकरी काय म्हणाले?

कालचा भाग पाहून नेटकरी आता सुरजच्या विरुद्ध बोलताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, 'त्याला आधीच गेम समजत नाही. त्यात डिपी दादांनी त्याला मदत केली तरी काहीच उपयोग झाला नाही. संपूर्ण सीझन तो दुसऱ्यांच्या बोलण्यानुसार वागला आहे.' दुसऱ्याने लिहिलं, 'सुरजला उगीच डोक्यावर घेतलंय.अभिनंदन महाराष्ट्र असा Winner निवडलाय तुम्ही. ज्याला महिला सदस्यांसोबत Task कसा खेळायच हेही कळत नाही. हेच कुणी दुसऱ्या पुरुष सदस्याने केले असते तर हीच जनता त्या सदस्याला ट्रोल करायला दोन पट पुढे राहतील. हीच जनता जी छोट्या छोट्या कारणावरून अंकिताला ट्रोल करत असते.' आणखी एकाने लिहिलं, 'आता कुठे गेले जे या टास्कवरून अंकिताला ट्रोल करत होते? तिने किमान वर्षा ताईंसोबत नीट टास्क तरी खेळला होता.' अनेक नेटकऱ्यांनी जान्हवीचं कौतुक केलं आहे.

bb marathi 5

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT