bigg boss marathi 5 top 3 contestants  esakal
Premier

कोण उचलणार 'बिग बॉस मराठी ५'ची ट्रॉफी? सात पैकी 'या' तिघांना चाहत्यांचा फुल सपोर्ट; म्हणतात- शेवटी तेच...

Bigg Boss Marathi 5 Winner Prediction: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' आता काही दिवसांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

Payal Naik

Marathi Entertainment News Updates: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' आता शेवटच्या टप्प्यावर आहे. घरात गुरुवारी शेवटचं एव्हिक्शन होणार आहे. त्यात घरातील सहा सदस्य नॉमिनेटेड आहेत. आता या आठवड्यात घरातून कोण बाहेर जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर दुसरीकडे रविवारी ६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षक नेमकं या सिझनची ट्रॉफी कोण जिंकणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या सीझनमध्ये टॉप ३ मध्ये नेमके कोण असणार हे पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत. मात्र प्रेक्षकांनी घरातील या तीन सदस्यांना आधीच टॉप ३ मध्ये नेऊन बसवलं आहे. या तीन सदस्यांना सगळ्यात जास्त प्रेम मिळत आहे. कोण आहेत ते सदस्य?

या घरात सुरुवातीपासूनच रीलस्टार सुरज चव्हाण हा प्रेक्षकांची पसंती ठरलेला आहे. जेव्हा जेव्हा तो नॉमिनेशनमध्ये आला तेव्हा तेव्हा चाहत्यांनी त्याला घराबाहेर होण्यापासून वाचवलं. त्यामुळे सूरजला त्याच्या चाहत्यांचा प्रचंड मोठा पाठिंबा आहे. तर दुसरा व्यक्ती आहे अभिजित सावंत. 'इंडियन आयडल' चा पहिला सीझन जिंकल्यानंतर आता घरातही तो उत्तम खेळ दाखवताना दिसला. त्याचा चाहतावर्गही चांगलाच मोठा आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मते बिग बॉस मराठी ५ मध्ये टॉप ३ मध्ये अभिजित सावंत असायलाच हवा.

तिसऱ्या क्रमांकावर कोण?

तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे कोकणकन्या अंकिता वालावलकर. सर्वसामान्य घरातली एक मराठी मुलगी बिग बॉस सारख्या खेळात शेवटच्या आठ्वड्यापर्यंत जाऊन पोहोचते हे पाहून अनेकांना तिचा अभिमान आहे. एकीकर बिग बॉस अंकिता आणि धनंजय यांची इमेज खराब करण्याकडे लक्ष देत आहेत. त्यांच्या विरोधातले व्हिडिओ पोस्ट करत आहेत. आणि टीआरपीसाठी निक्कीला जास्तीत जास्त चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र बाहेर प्रेक्षकांना बिग बॉसचा गेम प्लॅन लक्षात आल्याने ते अंकिताला जास्त पाठिंबा देताना दिसत आहेत. सुरुवातीपासून सुरजच्या पाठीशी खंबीरपण उभी असणारी अंकिता या सीझनची विजेती नक्कीच होऊ शकते असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता सुरज अंकिता आणि अभिजित या तिघांना प्रेक्षक पाठिंबा देताना दिसत आहेत.

एकीकडे सुरुवातीपासून सुरजला नावं ठेवणारी निक्की आता अरबाज घराबाहेर गेल्यावर सुरज आणि अभिजितसोबत राहून आपला गेम प्लॅन करताना दिसतेय. तर डिपी दादा आणि अंकिता यांना जाणीवपूर्वक वाईट दाखवलं जातंय असं म्हणत आता चाहते डीपी दादांना देखील सपोर्ट करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT