Anagha Bhagre esakal
Premier

Bigg Boss Marathi: बाईई, बुगुबुगुच्या श्रीमुखात लगावायचीये... मराठी अभिनेत्रीने बिग बॉसकडे केली वाईल्ड कार्ड एन्ट्रीची विनंती

Anagha Bhagre Instagram Status : निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांच्यातील संघर्ष आणि अंकिता वालावळकरच्या कप्तानीमुळे शोचा उत्साह वाढला आहे.

Sandip Kapde

मराठी बिग बॉसचा नवीन सीझन सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना दररोज नवनवीन वळणांचे अनुभव येत आहेत. या शोची लोकप्रियता वाढत आहे, आणि यामध्ये नवीन खेळाडूंच्या प्रवेशाने शोचा रोमांच आणखी वाढला आहे. ताज्या बातमीनुसार, 'रंग माझा वेगळा' फेम अनघा भगरे ने एक दिवस वाइल्ड कार्ड बनून बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश देण्याची विनंती केली आहे.

मराठी बिग बॉसचा हा सीझन दिवसेंदिवस अधिक रंगतदार आणि तणावपूर्ण होत आहे. अनघा भगरेच्या शोमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली. निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांच्यातील संघर्ष आणि अंकिता वालावळकरच्या कप्तानीमुळे शोचा उत्साह वाढला आहे. या सर्व घटकांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे आणि पुढील भागांमध्ये काय होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

अनघाच्या स्टेटसने उडवली खळबळ-

अनघा भगरेच्या इंस्टाग्राम वरच्या स्टेटसने चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडवली आहे. स्टेटसवर अनघाने निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांच्या कानाखाली मारायची इच्छा व्यक्त केली आहे. या विधानामुळे अनघाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर जोरदार चर्चा केली आहे. अनघाचे हे आव्हान घरातील खेळाडूंमध्ये नवा रंग भरण्याचे संकेत देत आहे.

निक्की आणि जान्हवीच्या संघर्षाचा गाजावाजा-

निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर या दोन स्पर्धकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. निक्कीच्या वेगळ्या खेळ शैलीने आणि जान्हवीच्या तितक्याच हट्टीपणामुळे त्यांच्या संघर्षाची चर्चा घरातील इतर सदस्य आणि प्रेक्षकांमध्ये जोरदार होत आहे. अनघाच्या आगमनाने या संघर्षाला नवा मोड मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनघाच्या आगमनाची वाटचाल-

अनघा भगरेचा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला तर हा शोच्या पुढील भागांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तिच्या आगमनाने घरातील सदस्यांची रणनीती बदलू शकते. अनघाच्या चाहत्यांना तिच्या खेळाच्या शैलीची उत्सुकता आहे आणि तिच्या प्रवेशाने शोमध्ये काय नवीन घडणार आहे याची प्रतीक्षा आहे. पण ही तीची फक्त इच्छा आहे. त्यामुळे अनघाने आपला राग स्टेटसवर व्यक्त केल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT