Suraj Chavan Esakal
Premier

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीत वर्णभेद ? , सूरज चव्हाणवर होणाऱ्या भेदभावावर चला हवा येऊ द्या फेम अभिनेता भडकला

Marathi actor questions partiality in Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठी सीजन ५ चांगलाच चर्चेत आहे. या सीजनमध्ये सूरज चव्हाणवर होणाऱ्या अन्यायावर मराठी अभिनेत्याने संताप व्यक्त केला.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ चांगलाच गाजतोय. घरात पहिल्या दिवसापासूनच वाद, मतभेद सुरु झाले आहेत. तर घरात दोन गट पडलेलेही पाहायला मिळत आहेत. त्यातच सूरज चव्हाण हा स्पर्धक पहिल्या दिवसापासून त्याच्या वागण्याने सगळ्यांची मनं जिंकत आहेत. त्यामुळे त्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहेत.

सूरजचा घरातील वावर जरी प्रेक्षकांना आवडत असला तरीही घरातील एक गट सुरजवर सगळ्या कामांचा भार टाकताना दिसतोय. याबाबत चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवेने फेसबुकवर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली. घरातील सदस्य वर्णभेद करत आहेत असा आरोपही त्याने यावेळी.

अंकुरने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. "दोन्ही टाइमचे भांडे, साफसफाई, चपला ज्या त्याच्या नाहीततरीही सूरज ने का कराव? सूरज सारखा काहीच होऊ शकत नाही (जे समाजवेगळे दिसतात, वागतात, बोलतात अशा सगळ्याना बोलणारे ९०%) तो या शो मधे या सगळ्यांच प्रतिनिधित्व करतोय तरीही सगळ्याना आपला गेम खेळायचा आहे पण तो सगळं बघून घाबरलाय. हापशीवर (हँडपंप) होणाऱ्या भांडणापेक्षा हे लय बेकार आहे आणि एवढे सुंदर दिसणारे लोक असे का वागत असतील कदाचित ह्यात तो अडकलाय. बाकी लोकना भांडी घासता येत नाही म्हणून रडणारे आणि जरी तुझे जोडे नसतील तर ते बाजूला ठेव सांगणारे आणि माझे नाहीत मी नाही उचलणार म्हटल्यावर सुरजवर चढ चढ चढतात! बाकी जातीवाद, वर्णवाद आणि वर्गवाद, शिंपथी यावर मी बोलू शकत नाही एवढी समज नही माझी." असं अंकुर त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला.

अंकुरच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याच्या म्हणण्याला संमती दर्शवली. सुरजवर अन्याय होतोय असं अनेकांनी म्हंटलं. "सुरज आहे तसाच जरी वागला ना या सर्वांना पुरून उरेल तो.. बिग बॉस ने चार्ज केल्यावर तो आता थोडा बदलला आहे. अजून त्याने आपला नैसर्गिक स्वभाव तिकडे दाखवावा .. सर्वात जास्त मनोरंजन करणारा तोच तिकडं असेल..." असं म्हणत एका युझरने त्याचं कौतुक केलं.

२ ऑगस्टच्या एपिसोडमध्ये सुरजने बेडरूममध्ये असलेल्या चपला उचलण्यास नकार दिल्यावर जान्हवी आणि निक्की त्याच्यावर भडकलेल्या पाहायला मिळाल्या. यावरून त्या दोघींवर टीका होतेय. सुरजचा पुढचा गेम कसा असणार हे पाहण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठा सीजन ५ फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT