bigg boss marathi 5 contestanst  esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 Contestants List: आर्या जाधव ते पंढरीनाथ कांबळे, हे १६ कलाकार घालणार बिग बॉस मराठीच्या घरात राडा; वाचा यादी

Bigg Boss Marathi 5 All Contestant List: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' च्या घरात यावेळेस कोणकोणते कलाकार आले आहेत याची यादी पाहा.

Payal Naik

लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' चा ग्रँड प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला. यावेळेस हे 16 सदस्य घरात कल्ला करताना दिसणार आहेत. इथे प्रत्येकजण आपापले गेम प्लॅन घेऊन येतो. आता घरात आलेले सगळे सदस्य हे खास गेम प्लॅन ठरवून आले आहेत. यात कोण कुणाच्या वरचढ ठरणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. त्यापूर्वी घरात नेमके कोणकोणते सदस्य आले आहेत हे जाणून घेऊया.

1) वर्षा उसगावकर

९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी आता 'बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री केली आहे. त्यांनी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून नुकताच निरोप घेतला होता. त्यानंतर त्यांच्या बीबीच्या घरात येण्याच्या चर्चा सुरू होत्या.

2) निखिल दामले

कलर्स मराठीवरील 'रमा राघव' मालिकेतील अभिनेता निखिल दामले याने बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री केली आहे. तो मालिकेत राघवच्या मुख्य भूमिकेत दिसत होता.

3) अंकिता वालावलकर

लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर अंकिता वालावलकर हिने 'बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री केली आहे. अंकिता चाहत्यांमध्ये कोकण हार्टेड गर्ल म्हणून लोकप्रिय आहे.

4) योगिता चव्हाण

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'जीव माझा गुंतला' मधील अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आता 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दिसणार आहे.

5) जान्हवी किल्लेदार

लोकप्रिय मालिका 'भाग्य दिले तू मला फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेदार आता 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात दिसणार आहे. तिने मालिकेत सोनियाची भूमिका केली होती.

6) अभिजित सावंत

लोकप्रिय गायक अभिजित सावंत याची 'बिग बॉस मराठी ५' मध्ये एंट्री झाली आहे.

7) निकी तांबोळी

तामिळ आणि तेलगू चित्रपटांमधून पाणी हिंदी मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री निकी तांबोळी यावेळेस घरात राडा घालताना दिसणार आहे. निकीने यापूर्वी 'बिग बॉस १४' मध्येही सहभाग घेतला होता. तर ती 'खतरो के खिलाडी'मध्येही दिसली होती. आता ती मराठी बिग बॉस मध्ये दिसणार आहे.

8)पंढरीनाथ कांबळे

आपल्या विनोदी शैलीच्या आधारावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा लोकप्रिय अभिनेता पंढरीनाथ कांबळे आता बिग बॉसच्या घरात आला आहे.

9)छोटा पुढारी

छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनश्याम दरोडे आता बिग बॉस मराठीच्या घरात आला आहे.

10)आर्या जाधव

अमरावतीची रॉकस्टार रॅपर आर्या जाधव आता 'बिग बॉस मराठी ५' च्या घरात दिसत आहे.

11)कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील

'बिग बॉस मराठी ५' च्या घरात आता आणखी एका कीर्तनकाराची एंट्री झाली आहे. कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील आता 'बिग बॉस मराठीच्या घरात आले आहेत. यापूर्वी कीर्तनकार शिवलीला ताई या घरात आल्या होत्या.

12)धनंजय पोवार

लोकप्रिय रीलस्टार, बिझनेसमॅन आणि इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार आता 'बिग बॉस मराठी ५' च्या घरात दिसत आहेत.

13)इरिना रुदाकोवा

लोकप्रिय परदेशी मॉडेल इरिना रुदाकोवा आता 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात दिसणार आहे. ती प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.

14)वैभव चव्हाण

मन झालं बाजिंद' या मालिकेतील अभिनेता वैभव चव्हाण याची 'बिग बॉसच्या घरात दमदार एंट्री झाली आहे.

15) अरबाज पटेल

स्प्लिट्स व्हिलामधील लोकप्रिय स्पर्धक अरबाज पटेल बिग बॉस मारुतीच्या घरात आला आहे.

16) सुरज चव्हाण

आता प्रेक्षक आणखीनच उत्साहीत होणार आहेत. कारण सोशल मीडियावर गुलीगत धोका म्हणून प्रसिद्ध असलेला सुरज चव्हाण आता 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चारित्र्य पडताळणी दाखला कसा काढायचा? महा-ई-सेवा केंद्रातून ‘या’ वेबसाईटवर करा अर्ज, १५९ रुपयांच्या शुल्कात ७ दिवसांत मिळेल दाखला, वाचा...

आजचे पंचांग १० ऑगस्ट २०२६! सोमप्रदोषासह जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

Falahari Sandwich: उपवासात रोज साबुदाणा नको! झटपट बनवा चटपटीत फलाहारी सँडविच; चवीसोबत पोटही राहील भरलेलं

आजचे राशिभविष्य - १० ऑगस्ट २०२६

ढिंग टांग : आखरी रस्ता : एक पाहणी..!

SCROLL FOR NEXT