Bigg Boss Marathi Esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 : अंडरवॉटर थीम बेडरूम आणि जंगल असलेला गार्डन एरिया ; बिग बॉस मराठीचं नवीन ग्रँड हाऊस पाहा, 'ही' गोष्ट टाकली काढून

Bigg Boss Marathi 5 House Photo Went Viral : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५चा ग्रँड प्रीमियर आज पार पडणार आहे. नवीन पर्व सुरु होता बिग बॉस मराठीचं नवीन घर कसं असणार ? काय आहे यावेळीची खासियत जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi 5 Grand Premier : बहुप्रतीक्षित बिग बॉस मराठी सीजन ५ चा प्रीमियर आज २८ जुलैला पार पडणार आहे. यानिमित्ताने बिग बॉस मराठीच्या यंदाच्या घराची थीम रिव्हील करण्यात आली. बिग बॉस मराठीच्या नव्या घरात अनेक बदल करण्यात आले आहेत. यंदाची थीम आणि घराची खासियत जाणून घेऊया.

कलर्स मराठीच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत घराची झलक दाखवण्यात आली. बिग बॉस मराठी सीजन ५ चं हे आलिशान घर बघून अनेकांना धक्का बसला. यावेळी बिग बॉस मराठीच्या घरात अनेक बदल करण्यात आले असल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळालं. यावेळी बिग बॉस मराठीचं घर दोन वेगवेगळ्या थीमचं कॉम्बिनेशन करून बांधण्यात आलं आहे.

बिग बॉस मराठीच्या यंदाच्या घराला ग्रँड एंटरन्स मिळाला असून मुख्य दरवाजावर एक मोठी माणसाच्या चेहऱ्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तर बिग बॉस मराठीच्या गेटवर सुद्धा तशी प्रतिकृती दिसत असून त्यात मानवी स्वभावातील विविध रूपं रेखण्यात आली आहेत. तर यावेळी बिग बॉस मराठीच्या बेडरूम्समध्ये अंडरवॉटर थीम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बेडरूम्स जांभळ्या आणि निळ्या रंगाच्या कॉम्बिनेशन असलेल्या इंटिरियरमध्ये सजवलेले असतील. तर यावेळची कॅप्टन रूम मोठी असून पूर्णपणे काचेची करण्यात आली आहे. बाथरूमचा दरवाजा लिफ्टच्या दरवाजाप्रमाणे करण्यात आला आहे. पहिल्यांदाच बिग बॉस मराठीच्या घरात मोठी कॅप्टन रूम उभारण्यात आली आहे. तर बाथरूमसुद्धा अंडरवॉटर थीममध्येच तयार केल्याचं दिसत आहे.

पहा बिग बॉस मराठीचं पूर्ण घर :

बिग बॉस मराठीचं किचन, बाल्कनी, कॉमन रूम आणि गार्डन एरिया मात्र जंगल थीमनुसार बनवण्यात आला आहे. पूर्णपणे गवत, झाडं आणि लाकडी फर्निचर यांचा वापर करून या रूम्स सजवण्यात आला आहे. यावेळी बिग बॉस मराठीचं घर ग्रँड असलं तरीही त्याला देण्यात येणारा मराठमोळा टच मात्र यंदा मिसिंग आहे. मराठी बिग बॉसचं प्रतीक म्हणून लावण्यात येणारी मराठमोळी नथ किंवा चंद्रकोर यंदाच्या बिग बॉस मराठीच्या घरात मिसिंग असल्याचं मात्र दिसून असल्यामुळे प्रेक्षक ही गोष्ट मिस करणार आहेत.

आज २८ जुलैला रात्री ९ वाजता बिग बॉस मराठी सीजन ५ चा ग्रँड प्रीमियर पार पडतोय. अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. यावेळी बिग बॉस मराठीच्या घरात कोण कलाकार जाणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Latest Maharashtra News Updates Live : नांदणी मठानं याचिका दाखल करावी- मुख्यमंत्री फडणवीस

संतापजनक! पतीकडून सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीची चाकूने भोसकून हत्या, सपना जोरजोरात ओरडत होती पण..; खोलीभर पसरलं होतं रक्त

Godavari River: अंबड तालुक्यातील तरुण युवकाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Karad News: 'रस्त्यांचे हक्क उठविण्यासाठी सर्व्हे'; घरकुलांसाठी मिळणार जागा; बेघरांना लाभ, अतिक्रमणेही होणार नियमित

SCROLL FOR NEXT