Bigg Boss Marathi Season 5 Esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 : दणक्यात सुरू होणार बिग बॉस मराठी सीजन 5; "धरल्याबगर सोडलं नाय " म्हणत रितेश भाऊंची ग्रँड एन्ट्री

Bigg Boss Marathi 5 Grand Premier : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चा ग्रँड प्रीमियर थाटात पार पडणार आहे. जाणून घेऊया त्याचे खास अपडेट्स.

सकाळ डिजिटल टीम

कलर्स मराठीवरील बहुप्रतिक्षित शो बिग बॉस मराठी सीजन 5 सुरू होतोय. मी रितेश विलासराव देशमुख..." असं म्हणत महाराष्ट्राचा लाडका दादा अर्थात रितेश भाऊ असं म्हणत या सीजनचे नवीन होस्ट रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या ग्रँड मंचावर एन्ट्री घेणार आहेत. आज रात्री 9 वाजता बिग बॉस मराठी सीजन 5 चा प्रीमियर दणक्यात पार पडणार आहे.

घरातील सदस्यांवर आपली भुरळ पाडायला रितेश भाऊ सज्ज आहे. रितेश भाऊ आणि कमाल स्पर्धकांमुळे 'बिग बॉस'प्रेमींना मनोरंजनाचा मोठा खजिना मिळणार आहे. सोशल मीडियावर नुकताच रितेश देशमुख यांच्या ग्रँड एंट्रीचा प्रोमो शेअर करण्यात आला. ,"धरल्याबगर सोडलं नाय तर रितेश विलासराव देशमुख आपलं नाव नाही" अस म्हणत रितेश दादांनी बिग बॉस मराठी सीजन 5 च्या मंचावर एन्ट्री घेतली.

'बिग बॉस मराठी'चं नवं पर्व सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. रितेश भाऊच्या प्रोमोव्यतिरीक्त आतापर्यंत सदस्यांचे अनेक नॉन रिव्हिल प्रोमो आऊट झाले आहेत. त्यामुळे 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये कोणते सदस्य असतील, घरात नवीन काय राडे आणि धमाके होणार हे पाहण्यास प्रेक्षकही उत्सुक आहेत.

मराठी मनोरंजनाचा बॉस “BIGG BOSS मराठी”चा Grand Premiere उद्या 28 जुलै, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर पाहायला मिळेल.

यंदाच्या पर्वात अंकिता वालावलकर, विवेक सांगळे, वर्षा उसगावकर, अंकिता जाधव, निकी तांबोळी हे कलाकार सहभागी होणार असल्याचे म्हंटल जातंय. पण या बातमीत किती तथ्य आहे ते आजच्या ग्रँड प्रीमियरलाच पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime Ayush Komkar: ''बाळा तुला चॉकलेट घेऊन आलोय मी...'' बापाने फोडला हंबरडा; ''माझ्या मुलाची काय चूक होती?''

National Herald case : 'नॅशनल हेरॉल्ड' प्रकरणी राहुल अन् सोनिया गांधींच्या अडचणीत वाढ होणार?; 'ED'ने टाकलं मोठं पाऊल!

कोट्यावधींचा मालक असलेल्या अक्षय कुमारला मिळणार सासऱ्यांचीही प्रॉपर्टी; राजेश खन्नांनी ट्वींकलच्या नावे केलेली संपत्ती किती?

High Blood Sugar: तुमचंपण ब्लड शुगर सामान्य पातळीपेक्षा जास्त आहे? डॉक्टर सांगतात लगेच हे उपाय करायला

Latest Marathi News Updates: काँग्रेसने ओबीसींच्या विश्वासघात केला - भाजपा

SCROLL FOR NEXT