Bigg Boss OTT 3 sakal
Premier

Bigg Boss OTT 3: "बायका 2-2 नवरे ठेवू लागल्या तरीही..."; अरमान आणि त्याच्या दोन पत्नींच्या बिग बॉसमधील एन्ट्रीवर भडकली देवोलीना

Armaan Malik: अरमाननं पत्नी कृतिका (Kritika malik) आणि पायलसोबत (Payal Malik) 'बिग बॉस OTT 3' (Bigg Boss OTT 3) मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे.

priyanka kulkarni

Bigg Boss OTT 3: बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमाचा तिसरा सीझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रसिद्ध युट्यूबवर अरमान मलिकने (Armaan Malik) त्याच्या दोन पत्नींसह बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. अरमाननं पत्नी कृतिका (Kritika malik) आणि पायलसोबत (Payal Malik) 'बिग बॉस OTT 3' (Bigg Boss OTT 3) मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतल्यानंतर अनेकांनी या कार्यक्रमाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अशातच आता अरमान आणि त्याच्या दोन पत्नींच्या बिग बॉसच्या घरातील एन्ट्रीवर अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीनं प्रतिक्रिया दिली आहे.

देवोलीनानं शेअर केलं ट्वीट

देवोलीनानं देखील बिग बॉस या शोमध्ये सहभाग घेतला होता. आता अरमाननं दोन पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यानंतर देवोलीनानं बिग बॉस शो आणि अरमानला खडे बोल सुनावले आहेत. देवोलीनानं अरमान आणि त्याच्या दोन पत्नीचा बिग बॉस ओटीटी-3 या शोमधील व्हिडीओ शेअर करुन ट्वीटमध्ये (X) लिहिलं, "हे मनोरंजक आहे असे तुम्हाला वाटते का? ही करमणूक नाही, ही घाण आहे. ही गोष्ट हलक्यात घेण्याची चूक करू नका कारण हे एक रील नाही तर ते रिअल आयुष्य आहे. म्हणजे या निर्लज्जपणाला करमणूक कशी म्हणता येईल? हे मला समजत नाहीये मला फक्त ते ऐकून तिरस्कार वाटतो की, अवघ्या 6/7 दिवसात प्रेम झालं, लग्न झालं आणि मग बायकोच्या जवळच्या मैत्रिणीसोबत पण तेच झालं. हे माझ्या कल्पनेपलीकडचे आहे."

"बिग बॉस, कार्यक्रमाला काय झालं आहे? या कार्यक्रमाचे एवढे वाईट दिवस आले आहेत का? की, यांना बहुपत्नीत्व मनोरंजक वाटत आहे? जेव्हा तुम्ही अशा स्पर्धकांना कार्यक्रमामध्ये एन्ट्री देता तेव्हा तुम्ही काय विचार करता? हा शो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण पाहतात. तुम्ही नवीन पिढीला काय शिकवण देत आहात की, तुम्ही २-३-४ लग्न करु शकता आणि आनंदाने एकत्र राहू शकता?", असंही देवोलीनानं ट्वीटमध्ये लिहिलं.

पुढे तिनं ट्वीटमध्ये लिहिलं, "म्हणूनच विशेष विवाह कायदा आणि UCC (युनिफॉर्म सिव्हिल कोड) अनिवार्य असावे. जेणेकरून कायदा सर्वांसाठी समान असेल आणि समाज अशा घाणेरड्या गोष्टींपासून मुक्त होऊ शकेल. पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी, ही कल्पना करा जर समानतेच्या नावाखाली बायका 2-2 नवरे ठेवू लागल्या, तरीही तुमची करमणूक होईल का? या लोकांचे फॉलोवर्स नेमके कोण आहेत हे मला समजत नाही. ते कोणत्या कारणासाठी त्यांचे फॉलो करतात? जर तुम्हाला हा निर्लज्जपणा योग्य वाटला तर तुमचे जीवन व्यर्थ आहे. तुम्हाला नवीन पिढीला काय शिकवायचे आहे, की त्यांनी एकापेक्षा जास्त विवाह करावेत? जर 2-3 लग्नं करणं गरजेचं असेल तर करा आणि घरीच राहा. ही घाणेरडी मानसिकता जगात पसरवू नका. समाज म्हणून आपण केवळ विनाशाकडे जात आहोत. खरच लोक वेडे झाले आहेत आणि बिग बॉस कार्यक्रमाला नक्की काय झालं आहे, हे मला माहित नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्णधार पृथ्वी शॉ फेल, महाराष्ट्राच्या संघाला १५४ धावांचा पाठलागही जमेना! SMAT 2025 स्पर्धेत तिसरा पराभव

Crime: एक भीती अन् वडिलांची असहाय्यता... पित्यानं लेकीला अंधाऱ्या खोलीत २० वर्ष कैद केलं, हादरवणारं कारण समोर

Sangli Water Crisis : अशुद्ध पाण्याने किल्लेमच्छिंडगडचे नागरीक त्रस्त; किडनी स्टोनचा धोका वाढतोय!

IndiGo: इंडिगोचं चाललंय काय? 300 पेक्षा जास्त विमानं रद्द; DGCA पासून मंत्रालयापर्यंत बैठकांचा धडाका, आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

Latest Marathi News Live Update : गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मागितली दोन लाखांची खंडणी

SCROLL FOR NEXT