bigg boss ott 3 sakal
Premier

Bigg Boss OTT 3: माझ्या नकळत भेटले, बोलले... नवऱ्याकडून कशी झाली पायल मलिकची फसवणूक, सांगताना तिलाही अश्रू अनावर

Payal Malik On Armaan Malik: 'बिग बॉस ओटीटी ३' वरील पायल मलिक हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Payal Naik

'बिग बॉस ओटीटी ३' ने सुरू होताच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवायला सुरुवात केली आहे. सुरू झाल्यापासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. अत्यंत वादग्रस्त अशा या शोला चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. त्यातच चर्चेत आहे लोकप्रिय युट्युबर अरमान मलिक आणि त्याच्या पत्नी पायल आणि कृतिका मलिक. बिग बॉसमध्ये पहिल्यांदाच एक व्यक्ती आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. अशातच आता अरमानची पहिली पत्नी पायल मलिक हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती रडताना दिसतेय.

गुड न्यूज आहे

या व्हिडिओमध्ये पायल आपली फसवणूक नेमकी कशी झाली याबद्दल सांगताना दिसतेय. पायल अरमानची पत्नी असताना त्याने कृतिकासोबत लग्न कधी आणि कसं केलं, याबद्दल तिच्या मनातील खदखद सांगताना ती भावूक झाली. आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल आपल्याला काहीही ठाऊक नव्हतं. अचानक एक दिवस त्यांनी फोन करत आपल्याला गुड न्यूज आहे असं सांगितलं. पायल या व्हिडिओमध्ये म्हणते, 'कृतिका माझीच मैत्रीण. माझ्यामुळे ती घरात यायची. मी घराबाहेर गेले होते. कृतिका आणि अरमान एकत्र कुठेतरी बाहेर गेले, बोलले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.'

पायल पुढे म्हणाली, 'त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की काहीतरी सरप्राइज आहे. एक गुड न्यूज आहे. त्यांनी लग्न केलं होतं. नंतर मला समजलं की त्यांचं लग्न झालंय. ते आधीच भेटायचे, बोलायचे. मला थोडीफार शंका होती. मला त्यांच्या लग्नाची कुणकुण लागली होती. नंतर ते थेट लग्नच करून आले. माझ्या हातात काहीच नव्हतं.' एवढं बोलून पायल रडू लागते. यावर सगळे घरातील सदस्य तिचं सांत्वन करण्यासाठी पुढे येतात. या व्हिडिओवर नेटकरीही आपली प्रतिक्रिया देत आहेत. पायल या लग्नात आनंदी नाहीये पण तिला तिथे राहावं लागतंय, असं म्हणत नेटकरी तिची बाजू घेरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

SCROLL FOR NEXT