Bigg Boss OTT 3 sakal
Premier

Bigg Boss OTT 3: "दोन बायका फजिती ऐका!"; कोण आहे दोन पत्नींसह बिग बॉसमध्ये एन्ट्री करणारा अरमान मलिक?

Armaan Malik: अरमान मलिक हा कसा प्रसिद्ध झाला? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

priyanka kulkarni

Bigg Boss OTT 3: बिग बॉस ओटीटी 3 (Bigg Boss OTT 3) या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या कार्यक्रमाचा प्रीमियर काल (21 जून) पार पडला आहे. 16 स्पर्धकांनी यावेळी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. अशातच प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकनं (Armaan Malik) त्याच्या दोन पत्नी कृतिका मलिक (Kritika Malik) आणि पायल मलिकसह (Payal Malik) बिग बॉस ओटीटीमध्ये सहभाग घेतला आहे. अरमान, कृतिका आणि पायल हे आता बिग बॉसमध्ये कशाप्रकारे प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करणार हे बघण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातच अरमान मलिक हा कसा प्रसिद्ध झाला? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. जाणून घेऊयात अरमान मलिकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल...

अरमान मलिक हा प्रसिद्ध युट्यूबवर आहे. त्याच्या चॅनलला 7.67M सब्स्क्राबर्स आहेत.अवघ्या अडीच वर्षात तो भारतातील सर्वात प्रसिद्ध युट्यूबर्सपैकी एक युट्यूबर झाला.

2011 मध्ये अरमाननं पायलशी लग्न केले, त्या दोघांना चिरायू नावाचे एक मूल आहे. 2018 मध्ये अरमानने पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकासोबत लग्न केले.2022 मध्ये अरमान चर्चेत आला, कारण त्यावेळी त्याच्या दोन्ही पत्नी प्रेग्नट होत्या. अरमानला चार मुलं आहेत. त्यांची नावं चिरायू, तुबा, अयान आणि जैद अशी आहेत.

अरमान मलिकचे मलिक व्लॉग, फॅमिली फिटनेस, मलिक फॅमिली व्लॉग, चिरायू पायल मलिक, मलिक किड्स, नंबर 1 रेकॉर्ड्स आणि मलिक फिटनेस व्लॉग यांसारख्या YouTube चॅनेल आहेत.

"तुला कोणत्या पत्नीसोबत बेड शेअर करायला आवडतो?"असा प्रश्न अनिल कपूर यांनी बिग बॉसमध्ये एन्ट्री करण्याआधी अरमानला विचारला.या प्रश्नाचं उत्तर देताना अरमाननं पायलचं नाव घेतलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महापौर असताना मुरलीधर मोहोळ बिल्डरची गाडी वापरायचे? रविंद्र धंगेकरांचा आणखी एक खळबळजनक आरोप; गाडीचा फोटो अन् नंबरही सांगितला...

Arun Gawli Mumbai : अरूण गवळीनंतर आता मुलग्याची दहशत, जमीन व्यवहारात कोट्यावधींची फसवणूक; कोर्टाकडून अटक करण्याचे आदेश

CM Devendra Fadnavis: काँग्रेस आता अती डाव्या विचारांकडे झुकली मुख्यमंत्री : संवैधानिक संस्थांविषयी नकारात्मकता धोकादायक

KBC: गिट्टीखदानच्या मुलीने केबीसीत जिंकले २५ लाख रुपये १२ वर्षीय स्पृहा शिनखेडेच्या अद्भुत सामान्य ज्ञानाने ‘बिग बी’ ही प्रभावित

Rabi Crop: यंदा हरभरा, गहू पिकाचे क्षेत्र वाढणार; कृषी विभागाची तयारी, २.३ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन

SCROLL FOR NEXT