Arman Malik Esakal
Premier

Bigg Boss OTT Season 3 : अरमान करतोय दोन्ही बायकांमध्ये भेदभाव ? पायलला सोडून कृतिकाबरोबर अरमानचा रोमान्स ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Bigg Boss Ott S3 Video Viral: बिग बॉस ओटीटी सीजन ३चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Ott : बिग बॉस ओटीटी सीजन ३ (Bigg Boss Season 3) सध्या चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासूनच या शोमध्ये सहभागी झालेल्या तीन स्पर्धकांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हे स्पर्धक आहेत अरमान मलिक (Arman Malik) आणि त्याच्या दोन बायका पायल (Payal Malik), कृतिका(Krutika Malik). दोन बायका असलेला अरमान मलिक सोशल मीडियावर टीकेचा धनी बनलाय आणि त्यातच आता या तिघांचाही घरातील वावर वादग्रस्त ठरलाय.

सोशल मीडियावर अरमान मलिक (Arman Malik) आणि त्याची पत्नी कृतिकाचा (Krutika Malik) एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात तो कृतिकाला मिठी मारत असून तिला काहीतरी समजावतोय. तर पायल तिथे कुठेच उभी नाहीये. या व्हिडीओमुळे सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा रंगलीय कि अरमान फक्त कृतिकाला वेळ देत असून तो पायलकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतोय. अनेकांनी कमेंट्समध्ये याबाबत टीकाही केली आहे.

सध्या शोमध्ये अरमान (Arman Malik) त्याच्या पहिल्या पत्नीबरोबर पायलबरोबर बेड शेअर करतोय पण जास्तीत जास्त वेळ कृतिकाबरोबर घालवत असल्याचं पाहायला मिळालय. त्यामुळे अरमानला सध्या ट्रोल करण्यात आलंय.

पायल (Payal Malik) ही अरमानची पहिली पत्नी असून तिच्यामुळेच कृतिका त्याच्या आयुष्यात आली अशी कबुली पायलने स्वतः दिली. कृतिका ही पायलची बेस्ट फ्रेंड असून तिचा मुलगा चिरायूच्या बर्थडे पार्टीमध्ये कृतिकाची ओळख अरमानशी झाली. त्यानंतर फोटो घेण्याच्या निमित्ताने ते दोघेही एकमेकांशी बोलू लागले आणि प्रेमात पडले. जेव्हा हे पायलला समजलं तेव्हा तिने त्या दोघांचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे अरमान त्याच्या दोन पत्नींबरोबर राहू लागला. या तिघांना चार मुलं आहेत. त्यांची नावं चिरायू, ट्युबा, झैद आणि अयान अशी त्यांची नावं आहेत.

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले तिघेही आता बिग बॉस ओटीटी सीजन ३मध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या सहभागामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. अभिनेत्री देबोलीनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बिग बॉसच्या टीमवरही टीका केली. 'अशा लोकांना बिग बॉसमध्ये आणण्याचा अधिकार नाही' असं तिने म्हंटल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT