Urvashi Rautela In Politics Esakal
Premier

Urvashi Rautela: "माझं मत तुलात," लोकसभेसाठी तिकिट मिळाल्याचा उर्वशीचा दावा, सोशल मीडियावर मात्र कमेंट्सचीच हवा

Loksabha Election: दरम्यान उर्वशीच्या या दाव्यानंतर, संबंधीत पोस्टखाली यूजर्स मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत. तर काहीजण पाठिंबा देत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Urvashi Rautela In Politics:

बॉलिवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत बऱ्या-वाईट गोष्टींसाठी चर्चेत असते. आता देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना उर्वशीने असाच एक दावा केला आहे. ज्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.

उर्वशीने इन्स्टाग्राम चॅनल 'इन्स्टन्ट बॉलिवूड"शी बोलताना दावा केला आहे की, देशातील एका राजकीय पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तिला उमेदवारीसाठी विचारणा केली आहे. उर्वशीच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर अनेक भन्नाट कमेंट्स वाचायला मिळत आहेत.

दरम्यान उर्वशीला राजकारणात किती रस आहे, असे विचारले असता ती म्हणाली, तिला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आधीच तिकीटाची ऑफर मिळाली आहे.

उर्वशी म्हणाली "मला आधीच तिकीट मिळाले आहे. आणि आता मला निर्णय घ्यायचा आहे की, मी राजकारणात प्रवेश करायचा की नाही.

यावेळी उर्वशीने आपल्या चाहत्यांना आवाहन करत, तिने राजकारणात जावे की नाही, याबाबत सल्ले द्यावेत, असे म्हटले आहे.

Social Media Comments On Urvashi Rautela

दरम्यान उर्वशीच्या या दाव्यानंतर, संबंधीत पोस्टखाली यूजर्स मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत. तर काहीजण पाठिंबा देत आहे. यावेळी एक यूजर म्हणाला, "माझं मत कन्फर्म तुलाच मिळेल."

यावेळी कमेंट करताना दुसरा एक यूजर म्हणाला, "तिकिट? कशाचं? मुंबई लोकलचं? या पोस्टखाली आणखी एका यूजरने कमेंट करत उर्वशीला राखी सावंतच्या पक्षाचं तिकिट मिळाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान गेल्या काही काळात उर्वशी आणि भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांच्या नात्याबाबत अनेक चर्चा समोर यायच्या. मात्र, नंतर या फक्त वावड्या असल्याचे समोर आले होते. पुढे उर्वशीचे नाव पाकिस्तानच्या युवा गोलंदाज नसिम शाह याच्याशीही जोडले गेले होते.

या सर्व प्रकरणांमुळे उर्वशी सोशल मीडियावर सतत चर्चेत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT