Bollywood Actors sakal
Premier

Drug Case: ड्रग्सच्या विळख्यात अडकले होते कलाकार; कशी सोडली वाईट सवय? स्वत: सांगितला भयानक अनुभव

Bollywood Actors: कोण-कोणत्या कलाकारांना ड्रग्सचं व्यसन होतं? आणि त्या कलाकारांनी हे व्यसन कसं सोडलं? त्याबद्दल जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Drug Case: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ड्रग्स (Drug Case) प्रकरणे वाढत आहेत. अशातच पुण्यातील तरुणाईबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. काही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार देखील ड्रग्सच्या विळख्यात अडकले होते. पण आता त्यांनी ड्रग्सचं व्यसन करणं सोडलं आहे. कोण-कोणत्या कलाकारांना ड्रग्सचं व्यसन होतं? आणि त्या कलाकारांनी हे व्यसन कसं सोडलं? त्याबद्दल जाणून घेऊयात...

रणबीर कपूर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर देखील ड्रग्सच्या विळख्यात अडकला होता. एका मुलाखतीत रणबीरनं सांगितलं की, तो फिल्म स्कूलमध्ये असताना वीडचे (गांजा) सेवन करत होता. रॉकस्टार या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान देखील रणबीरनं त्याच्या भूमिकेसाठी वीडचे सेवन केले होते. याबाबत त्यानं एका मुलाखतीत सांगितलं, "रॉकस्टारच्या वेळी ती गोष्ट अभिनयाचे टूल म्हणून मी वापरली. सेटवर 300 ज्युनियर कलाकार प्रेक्षक म्हणून उभे होते. त्यामुळे माझ्यासाठी तिथे शूट करणे कठीण होते."

"नंतर मला समजले की, मी ड्रग्स घेत राहिलो तर माझ्या आयुष्यात काहीही होणार नाही. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात चुका करतो.", असंही रणबीरनं सांगितलं.

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तवर आधारित असणाऱ्या संजू या चित्रपटात संजयच्या ड्रग्स व्यसनाबद्दल दाखवण्यात आलं होतं. संजयनं रिहॅब सेंटरमध्ये जाऊन ड्रग्स व्यसनावर कशी मात केली? हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2016 मध्ये, संजयनं तो एलएसडी या सायकेडेलिक ड्रग्सच्या प्रभावाखाली असताना घडलेली एक किस्सा सांगितला. संजय म्हणाला, "माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये मला बोलावण्यात आले. मी तिथे गेलो आणि माझे वडील माझ्या समोर बसले होते. ते काय बोलत होता हे देखील कळत वव्हते, ते संथ गतीने बोलत होते, असा मला भास झाला. ते मेणबत्तीसारखे वितळत आहे, असा भास मला झाला होता. त्यामुळे मी त्याच्यावर उडी मारली होती.", तो म्हणाला होता.

"नाईन इयर्स ऑफ हेल" असे संजयने त्याच्या ड्रग फेजचे वर्णन केलं होते. संजय दत्तने नंतर हे व्यसन पूर्णपणे सोडले. हे व्यसन सोडून आता संजयला चार दशकांहून अधिक झाले आहेत.

प्रतिक बब्बर

अभिनेत्री स्मिता पाटीलचा मुलगा प्रतिकने IANS ला दिलेल्या मुलाखतीत ड्रग्ज विरोधात त्यानं लढलेल्या लढाईबद्दल सांगितलं. तो म्हणाला होता, "ड्रग्स हा माझ्या आयुष्याचा एक भाग होता, ज्याबद्दल अनेक लोकांना माहित नव्हते. इतक्या वर्षात लोकांनी, मला एक चांगला अभिनेता, एक आनंदी माणूस म्हणून पाहिले. पण ते तसे नव्हते. मी आनंदी नव्हतो, मी एक व्यसनी होतो."

फरदीन खान

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरदीन खानला पोलिसांनी 2001 मध्ये कोकेन बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर फरजीननं डिटॉक्सिफिकेशन कोर्स केला. या प्रकरणात इम्युनिटी मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला, जो 2012 मध्ये मंजूर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT