Payal Kapadia sakal
Premier

Cannes 2024: एकेकाळी लोक म्हणत होते 'देशद्रोही', आता कान चित्रपट महोत्सवात वाजवला भारताचा डंका'; जाणून घ्या फिल्ममेकर पायल कपाडियाबद्दल...

पायलचं सध्या देशभरात कौतुक होत आहे. पण एकेकाळी मात्र FTII मधून ग्रॅज्युएट झालेल्या पायलला अनेक लोक 'देशद्रोही' म्हणत होते.

priyanka kulkarni

Cannes 2024: कान चित्रपट महोत्सवात (Cannes Film Festival 2024) यंदा काही भारतीय चित्रपटांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये फिल्ममेकर पायल कपाडियाच्या (Payal Kapadia) चित्रपटाचा देखील समावेश होता. पायल कपाडियाचे नाव सध्या चर्चेत आहे. कान्सामध्ये देशाला गौरव मिळवून दिला आहे. पायलच्या कान चित्रपट महोत्सवाला 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' या चित्रपटाला ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला. पायलचं सध्या देशभरात कौतुक होत आहे. पण एकेकाळी मात्र FTII मधून ग्रॅज्युएट झालेल्या पायलला अनेक लोक 'देशद्रोही' म्हणत होते.

FTII ते कान्स या पायलच्या नऊ वर्षांच्या प्रवासात अनेक चढउतार आले. 2015 मध्ये, गजेंद्र चौहान हे FTII चे अध्यक्ष झाल्यानंतर पायलनं 139 दिवसांचे आंदोलन केले होते. पायल कपाडिया आणि इतर 34 माजी विद्यार्थिनींसह, संस्थेचे तत्कालीन संचालक प्रशांत पाठराबे यांनी दाखल केलेल्या खटल्यात कायदेशीर लढाई लढत आहेत, त्यांनी आरोप केला की, त्या वर्षी घेराव करुन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या लोकांमध्ये पायलचा समावेश होता.

पायलच्या बॅचमेट्स आणि इतर माजी विद्यार्थ्यांनी 2015 च्या त्यांच्या आंदोलनाबद्दल सांगितलं होतं की, 'चित्रपट निर्मितीमध्ये कोणतेही योगदान नसलेल्या लोकांच्या नियुक्तीच्या विरोधात ते आंदोलन होते. परंतु त्यांना राजकीय कारणांसाठी कथितपणे FTII च्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

2015 च्या FTII चळवळीवर आधारित असणाऱ्या पायलच्या चित्रपटाने कान्स लॉरेल देखील जिंकला. याव्यतिरिक्त, FTII चे विद्यार्थी चिदानंद नाईक यांच्या 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो' या चित्रपटाला ला सिनेफ विभागात पुरस्कार मिळाला आहे.

पायल तिच्या यशाचे श्रेय तिच्या FTII मधील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दिले आहे, "सिनेमाची आवड असलेल्या लोकांना भेटण्यासाठी FTII हे एक उत्तम ठिकाण आहे. माझ्या विचारांना आकार देण्यात माझ्या बॅचमेट्सनी महत्त्वाची भूमिका बजावली. FTII मध्ये, आम्हाला जगभरातील चित्रपट पाहायला मिळाले आणि या प्रदर्शनामुळे मला माझा चित्रपट बनवण्यात मदत झाली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT