Ashok Pathak sakal
Premier

Cannes Film Festival: अन् त्याच्यासाठी दहा मिनिटं झाला टाळ्यांचा कडकडाट! 'पंचायत'च्या बिनोदचा कान चित्रपट महोत्सवात डंका

Ashok Pathak: अशोकनं सातासमुद्रापार देखील डंका वाजवला आहे. अशोकच्या चित्रपटाचे स्क्रिनिंग कान चित्रपट महोत्सवात झाले आहे.

priyanka kulkarni

Ashok Pathak Film Get Standing Ovation In Cannes: 'पंचायत' या वेब सीरिज प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या वेब सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अशातच या वेब सीरिजमध्ये बिनोद ही भूमिका साकारणारा अभिनेता अशोक पाठक (Ashok Pathak) याला या वेब सीरिजमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. पंचायत वेब सीरिजमुळे अशोक रातोरात स्टार झाला. त्याचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच आता अशोकनं सातासमुद्रापार देखील डंका वाजवला आहे. अशोकच्या चित्रपटाचे स्क्रिनिंग कान चित्रपट महोत्सवात झाले आहे.

कान चित्रपट महोत्सवात झाले 'सिस्टर मिडनाईट'चे प्रीमियर

अशोकच्या 'सिस्टर मिडनाईट' या चित्रपटाचा प्रीमियर कान चित्रपट महोत्सवात झाले. राधिका आपटे आणि अशोक पाठक यांनी दिग्दर्शक करण कंधारी यांच्या 'सिस्टर मिडनाईट' या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे.

10 मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन

अशोकच्या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवात 10 मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. अशोकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये लोक त्याच्या चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन देताना दिसले. राधिका आणि अशोकच्या या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं.

कान चित्रपट महोत्सवाच्या समांतर चालणाऱ्या डायरेक्टर्स फोर्टनाइट विभागात हा चित्रपट निवडण्यात आला होता, ज्यामध्ये जगभरातील चित्रपट दाखवले जातात.

अशोक पाठक लवकरच पुन्हा एकदा बिनोद या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ॲमेझॉन प्राइमच्या 'पंचायत' या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये अशोक हा पुन्हा एकदा बिनोदच्या भूमिकेत दिसणार आहे. 'पंचायत-3' ही वेब सीरिज 29 मे रोजी प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT