Nancy Tyagi sakal
Premier

Nancy Tyagi: 30 दिवस, 1000 मीटर कापड अन् 20 किलो वजन; कान चित्रपट महोत्सवात परिधान केला स्वत: शिवलेला ड्रेस, नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

Cannes Film Festival: नॅन्सीनं स्वत: शिवलेला ड्रेस कान चित्रपट महोत्सवात परिधान केला होता.

priyanka kulkarni

Nancy Tyagi In Cannes Film Festival: गेल्या काही दिवसांपासून कान चित्रपट महोत्सव (Cannes Film Festival) सुरु आहे. या महोत्सवात विविध सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांच्या कान चित्रपट महोत्सवातील लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. पण सध्या मात्र एका तरुणीच्या कान चित्रपट महोत्सवातील लूकची चर्चा होत आहे. या तरुणीचं नाव नॅन्सी त्यागी असं आहे. नॅन्सीनं स्वत: शिवलेला ड्रेस कान चित्रपट महोत्सवात परिधान केला होता. पण ही नॅन्सी त्यागी कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात नॅन्सीबद्दल आणि तिनं कान चित्रपट महोत्सवात परिधान केलेल्या ड्रेसबद्दल...

30 दिवस, 1000 मीटर कापड अन् 20 किलोपेक्षा जास्त वजनाचा ड्रेस

नॅन्सी त्यागीनं तिच्या कान चित्रपट महोत्सवातील रेड कार्पेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या ड्रेसबद्दल सांगितलं आहे. नॅन्सीनं कान चित्रपट महोत्सवातील फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "नवोदित कलाकार म्हणून 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर पाऊल ठेवणं अवास्तव वाटतं. 30 दिवस, 1000 मीटर फॅब्रिक आणि 20 किलोपेक्षा जास्त वजनाचा हा गुलाबी गाऊन मी मनापासून तयार केला आहे. प्रवास कठीण होता, पण प्रत्येक क्षण मोलाचा होता. तुम्हा सर्वांकडून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी आनंदाने आणि कृतज्ञतेने भारावून गेले आहे. हे एक स्वप्न सत्यात उतरले आहे, आणि मला आशा आहे की, माझ्या कामाने मी तुम्हाला चकित केले आहे कारण तुमच्या पाठिंब्याने मला प्रेरणा दिली आहे. मी मनापासून सर्वांचे आभार मानते."

जाणून घ्या नॅन्सी त्यागीबद्दल

नॅन्सी त्यागी ही मूळची उत्तर प्रदेशची आहे. ब्रूट इंडिया स्क्वॉडचा भाग म्हणून तिने कान चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर वॉक केला. नॅन्सीला इन्स्टाग्रामवर सुमारे 870,000 फॉलोवर्स आहेत. YouTube वर तिला एक मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. नॅन्सी ही तिच्या DIY ड्रेस डिझाइन आयडियामुळे प्रसिद्ध झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

SCROLL FOR NEXT