Premier

Cat Lover Celebrities: या बॉलीवूड कलाकारांचे सर्वात चांगले मित्र आहेत त्यांच्या मांजरी, वाचा गंमतीशीर बातमी

Bollywood Marathi News : सेलेब्रेटी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या मांजरींसोबत फोटो पोस्ट करत असतात.

सकाळ वृत्तसेवा

आज आंतरराष्ट्रीय मांजर दिवस आहे अशावेळी बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांसाठी त्याच्या मांजरी या त्यांचे खास मित्र आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? हे सेलेब्रेटी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या मांजरींसोबत फोटो पोस्ट करत असतात.

आलिया भट्ट

आलिया भट्ट जगासाठी एक मेगा स्टार आहे. मात्र तिच्या एक मांजर प्रेमी व्यक्ती आहे. तीच्या मांजराच नाव एडवर्ड आहे. एडवर्ड हा सोशल मिडीयावर इतकाच लोकप्रिय आहे. त्यांच्या लग्नाच्या दिवसापासून ते आउटिंगपर्यंत, एडवर्ड नेहमीच आलियाच्या सोबत असतो.

जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन फर्नांडिसकडे एक दोन नव्हे तर चार मांजरी आहेत. योडा, लोकी, मेव्हम्यू आणि झीझा अशी त्यांची नाव आहेत. जेव्हा अभिनेत्री कामात व्यस्त असते तेव्हा तिचे छोटे सोबती कधी कधी तिच्याभोवती झुलताना दिसतात. यामुळे ती नेहमीच त्या सर्वांची कळजी घेत असते.

नुसरत भरुचा

साहसी आणि मस्त स्वभावासाठी ओळखल्या जाणारी अभिनेत्री नुसरत भरुचाला मांजरी खूप आवडतात. तिच्या मांजराचे नाव नोहाची आहे. तिच्या छोट्या मित्रासोबत नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करतांना दिसत असते.

शमिता शेट्टी

शमिता शेट्टी आपण करत आसलेल्या कामासाठी ओळखली जाते. ती देखील एक खरी पाळीव प्राणी प्रेमी आहे! तिचे पेट्स पिक्सी, लोला, लोकी आणि फोबी, अनेकदा शमिताच्या पोस्ट आणि इंस्टाग्राम स्टोरीमध्ये दिसतात.

जिम सरभ

जिम सरभ हा खुप चांगला अभिनेता आहेच, पण एक अभिमानी पेट लव्हर पण आहे. मिमी असे तिच्या मांजरीचं नाव आहे. त्याची छोटी मांजर आणि तो एकत्र खुप छान दिसतात

दिशा पटानी

दिशा पटानीचे फॅशन आणि फिटनेसवरील प्रेम लपून राहिलेले नाही. पण ती तिच्या पाळीव प्राण्यांवर तितकेच किंवा कदाचित त्याहूनही जास्त प्रेम करते. तिच्याकडे दोन लहान मांजरी आहेत. जास्मिन आणि किट्टी अशी त्यांची नाव आहेत. अनेकदा ते दिशाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिसतात

ताहा शाह बदुशा

ताहा शाह बदुशा त्याच्या स्टायलिश लूकसाठी आणि करिष्माई व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते. ताहा शाह बदुशा कडे एक बोका आहे. व्हिस्काससोबत स्वत:चे मनमोहक फोटो शेअर करत असते.

शालिनी पांडे

तिच्या जन्मजात अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाणारी, शालिनी पांडे ही एक प्राणी प्रेमी आहे. शालिनी अनेकदा तिच्या छोट्या मांजरी सोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT