Kavita Kaushik  Esakal
Premier

Kavita Kaushik : म्हणून, मालिकांपासून दुरावली चंद्रमुखी चौटाला ; ती सध्या काय करते जाणून घ्या

FIR fame Kavita Kaushik leave Television industry : टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एकेकाळची आघाडीची कविता कौशिकने अभिनयक्षेत्र सोडण्यावर भाष्य केलं. ती सध्या काय करते जाणून घेऊया .

सकाळ डिजिटल टीम

Tv Enetertainment News : आपल्या धडाकेबाज अंदाजाने सगळ्या गुन्हेगारांना घाम फोडणारी चंद्रमुखी चौटाला आठवते का ? एफ आय आर या सब टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या या भूमिकेने सगळ्यांना वेड लावलं होतं. ही भूमिका साकारली होती अभिनेत्री कविता कौशिकने. पण सगळेजण तिला तिच्या खऱ्या नावापेक्षा चंद्रमुखी चौटाला म्हणूनच ओळखायचे. गेल्या दोन वर्षांपासून कविताने मालिकांपासून दूर राहणंच पसंत केलंय. सगळ्यांची लाडकी चंद्रमुखी सध्या काय करते जाणून घेऊया.

कविता कौशिकने नुकतीच टाईम्स नाऊ या चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने ती सध्या तिच्या नवऱ्याबरोबर पहाडांमध्ये राहत असून ती योग प्रशिक्षण देते. तसेच तिचा स्वतःचा एक आयुर्वेद औषधींसंबंधी ब्रँड असून हा बिझनेस ती तिच्या नवऱ्याच्या मदतीने चालवतेय. गेल्या काही काळात तिने पंजाबी सिनेमांमध्ये काम केलं आहे पण मालिकांपासून ती दूरच राहिलीये.

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने मालिका क्षेत्र सोडण्याचं तिचं कारण सांगितलं. ती म्हणाली,"मला टेलिव्हिजनवर आता काम करायचंच नाहीये. मी ३० दिवस काम नाही करू शकत. मला वेब शो आणि सिनेमांमध्ये काम करण्याची इच्छा आहे पण मी ती टिपिकल हिरोईन नाहीये जिला कोणत्याही सिनेमांमध्ये लगेच काम मिळेल. काही विशिष्ट प्रकारच्या भूमिकाच माझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतात. शैतानी रस्मे वगैरे नावाच्या प्रोजेक्टच्या ऑफर्स मला अजूनही येतात. पण आता मला मी तीन वर्षांपूर्वी जसं आयुष्य जगत होते तसं जगायचं नाहीये जेव्हा मी पूर्णवेळ टेलिव्हिजनसाठी काम करत होते. मी त्या काळासाठी कायम कृतज्ञ आहे पण त्यावेळी तरुण होते आणि मला पैशांची गरज होती. पण आता मला माझा वेळ तसा घालवायचा नाहीये. खरंतर एफआयआरचं शूटिंग फार काळ नसायचं तरीही मला त्रास व्हायचा."

कविताने रोनित बिस्वासशी लग्न केलं आहे. सोशल मीडियावर ती तिच्या आताच्या आयुष्यचं अपडेट्स शेअर करत असते. २०२२ साली तिने मॅडम सर या मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून एंट्री घेत चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारली होती. पण त्यानंतर ती प्रेक्षकांच्या भेटीस आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT