Chandu Champion Esakal
Premier

Chandu Champion : चंदू म्हणतोय 'सत्यानास';सिनेमाच्या नवीन गाण्याची होतेय 'या' गाण्याशी तुलना

अभिनेता कार्तिक आर्यनचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. जाणून घेऊया या गाण्याविषयी.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' सिनेमाची चर्चा सगळीकडे आहे. सिनेमाचा ट्रेलर सगळीकडे गाजत असून नुकतंच या सिनेमाचं पहिलं गाणं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. सत्यानास असं या गाण्याचं नाव असून अल्पावधीतच हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलंय.

कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' या सिनेमातील हे नवीन गाणं 'सत्यानास' या गाण्याची तुलना फरहान अख्तरच्या 'भाग मिल्खा भाग' सिनेमातील 'मस्तो का झुंड' या गाण्याशी केली जात आहे. या गाण्यात कार्तिकने घातलेले कपडे ते डान्समधील काही स्टेप्स आणि गाण्याचं संगीत शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याची आठवण करून देतात.

चालू ट्रेनमध्ये कार्तिक त्याच्या मित्रांसोबत डान्स करताना दाखवण्यात आलं असून भारतीय सैन्याच्या प्रवासातील हे गाणं असावं असा अंदाज आहे. प्रीतम चक्रवर्ती यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याच्या काही स्टेप्स शाहिद कपूरच्या गाजलेल्या 'गंदी बात' गाण्यातील स्टेप्सची आठवण करून देत आहेत. अरिजित सिंहने हे गाणं गायलं आहे.

पहा संपूर्ण गाणं:

परवा कार्तिकने गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर करत हे गाणं २४ मे ला रिलीज होणार असल्याची बातमी शेअर केली होती. 'Time for some Mauj 👊🏻The joy of dancing on the rooftop of a train' (मजा करण्याचा वेळ, ट्रेनच्या छतावर डान्स करण्याची मजा) असं कॅप्शन कार्तिकने या व्हिडिओला दिलं आहे.

चंदू चॅम्पियनच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

'चंदू चॅम्पियन' सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा सगळीकडे आहे. ट्रेलरला आतापर्यंत १२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत ३ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा सिनेमा पॅरालिम्पिक चॅम्पियन मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपटामध्ये मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनातील विविध टप्पे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन हा विविध लूकमध्ये दिसतो.

ट्रेलरची सुरुवात विजयराज यांच्या आवाजानं होते, ज्यामध्ये ते मुरलीकांत पेटकरची कथा सांगतात. भारतीय सैन्याचा भाग असलेल्या मुरलीकांत पेटकर यांना युद्धादरम्यान 9 गोळ्या लागल्या होत्या. हे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यांचा बालपणाबद्दल तसेच भारतीय सैन्यात भरती होण्यापासून ते ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

या सिनेमात कार्तिक सोबत विजयराज, राजपाल यादव, हेमांगी कवी, पलक लालवानी यांचीही मुख्य भूमिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT